ED Notice to Eknath Khadse: ED ची एकनाथ खडसेंना दहा दिवसात पावणे सहा कोटींची प्रॉपर्टी सोडण्याची नोटीस

गावगाडा
भरत जाधव
Updated Jun 02, 2022 | 07:59 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पाठीमागील ईडीचा (ED) ससेमिरा सुरूच आहे. गेल्या वर्षी जप्त केलेली पावणेसहा कोटी रुपयांची मालमत्ता दहा दिवसांत सोडावी, अशी नोटीस ईडीने पाठवली आहे.

Notice to release property worth Rs 6 crore to Khadse within 10 days
खडसेंना १० दिवसात पावणे ६ कोटींची प्रॉपर्टी सोडण्याची नोटीस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऑगस्ट महिन्यात खडसेंची जळगाव व लोणावळा येथील प्रॉपर्टी सोडण्याचे आदेश
  • या प्रॉपर्टीमध्ये भाडेकरू असल्यास अथवा स्वत: निवास असल्यास दहा दिवसांत खाली करण्याची नोटीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पाठीमागील ईडीचा (ED) ससेमिरा सुरूच आहे. गेल्या वर्षी जप्त केलेली पावणेसहा कोटी रुपयांची मालमत्ता दहा दिवसांत सोडावी, अशी नोटीस ईडीने पाठवली आहे. दरम्यान हे वृत्त खरं असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.
भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहाराच्या आरोपानंतर ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरुद्ध कारवाईला सुरुवात केली होती.

गेल्या वर्षी ईडीने खडसेंना नोटीसदेखील बजावली होती. या नोटिसीनंतर ऑगस्ट महिन्यात खडसेंची जळगाव व लोणावळा येथील ५ कोटी ७५ लाख रुपयांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती. या प्रॉपर्टीमध्ये भाडेकरू असल्यास अथवा स्वत: निवास असल्यास दहा दिवसांत खाली करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
दरम्यान, आपल्या नावावर एकच प्लाॅट आहे. त्यावर बांधकामदेखील झालेले नाही. त्यामुळे रिकामा करून देण्याची गरज नसल्याचे खडसेंनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी