आता हाॅटेल, माॅल, ऑफिसमध्ये No Vaccine, No Entry, ओमिक्राॅनच्या शिरकावाने वाढली चिंता

कोरोना आणि आता ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने नागरिकांवर निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करणेसाठी काही ठोस उपाययोजना करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत्वाने लसीकरण न झालेले नागरिक समूहात मिसळल्यास त्यांचे स्वतःचे आरोग्याचे दृष्टीने तसेच आजाराच्या प्रसाराच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरू शकतात. अशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आता हाॅटेल, माॅल, ऑफिसमध्ये No Vaccine, No Entry, ओमिक्राॅनच्या शिरकावाने वाढली चिंता
Now in Hotel, Mall, Office No Vaccine, No Entry, Concerns about omicron increased  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोना बाधीत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे
  • मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यामध्ये ओमिक्राॅनचे रुग्ण आढळू लागले
  • आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत.

अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट थांबतेना थांबते तोच आता जगभरात ओमिक्राॅनने डोके वर काढले आहे. भारतातही दिवसेंदिवस ओमिक्राॅन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. त्यातही महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारची चिंता वाढली असून राज्य सरकारने कठोर पावले टाकत शुक्रवारी नव्याने अनेक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, करोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत काळजीचे कारण बनलेल्या आणि अद्यापही करोनातून पुरेसा दिलासा न मिळालेल्या नगर जिल्ह्यात आता ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असून सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश देताना त्यांचे लसीकरणाबाबत शहानिशा करणे अनिवार्य करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचा आदेश काढला आहे. (Now in Hotel, Mall, Office No Vaccine, No Entry, Concerns about omicron increased)

अहमदनगर जिल्हयामध्ये दैनंदिनरित्या 40-70 दरम्यान कोरोना बाधीत रुग्णसंख्या आढळून येत असल्याने दक्षिण आफिक्रा आणि इतर काही देशांमध्ये कोविड-19 विषाणूचा B.1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला असून त्यास जागतिक संघटनेव्दारे (W.H.0.) ओमायक्रॉन (Omicron) हे नाव दिलेले आहे. सदर नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा कोविड-19 विषाणूच्या पूर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याचे आढळून आलेले आहे. गेल्या आठवड्यात नायजेरियातून श्रीरामपूरला (Shrirampur) आलेल्या ४१ वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करणेसाठी काही ठोस उपाययोजना करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत्वाने लसीकरण न झालेले नागरिक समूहात मिसळल्यास त्यांचे स्वतःचे आरोग्याचे दृष्टीने तसेच आजाराच्या प्रसाराच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरू शकतात. ही बाब विचारात घेऊन सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश देताना त्यांचे लसीकरणाबाबत शहानिशा करणे अनिवार्य करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणेबाबत धोरण स्विकारणेस दि.24/12/2021 रोजीच्या बैठकीत सर्व संमतीने मान्यता देण्यात आलेली आहे.

खालील निर्बध लागू करण्यात आले.

1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये, व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात “No Vaccine No Entry” याप्रमाणे निबंध लागू करीत आहे.

2) नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहील. व याशिवाय प्रवेश देणे प्रतिबंधित राहील.

3) कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन (Covid Appropriate Behaviour) चे तसेच राज्य व केंद्र शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.

4) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क परिधान करणे, नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी