आता शिंदे सरकारची शनिवारी बहुमत चाचणी!, विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

Eknath shinde : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार आहे.

Now the Shinde government's majority test on Saturday !, the election of the Speaker of the Assembly on the first day of the special session
आता शिंदे सरकारची शनिवारी बहुमत चाचणी!, विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार
  • मुख्यमंत्री शिंदे यांना बहुमत सिद्ध करणार
  • बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार

Maharashtra politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातून दहा दिवसांपासून राजकीय वातावरण तापले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अल्पमतानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार असून या बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे. (Now the Shinde government's majority test on Saturday !, the election of the Speaker of the Assembly on the first day of the special session)

अधिक वाचा : मुंबईत काळबादेवी परिसरात इमारतीचा भाग कोसळला

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री  एकनाथ शिंदे यांनी ५० शिवसेना आणि अपक्ष आमदार यांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याने भाजपने राज्यपालांची भेट घेऊन बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यानंतर सरकार पडले. दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांना भाजपने पाठिबा देऊन सरकार स्थापन करण्याची विनंती केली. राज्यपालांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

अधिक वाचा :

Deputy Cm : पडलेल्या चेहऱ्य़ाने देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, पहा व्हिडीओ

 महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात  झाली आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार आहे. बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणाप आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन 2  आणि ३ जुलै होणार आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे.

अधिक वाचा :

Eknath Shinde । शपथविधीनंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंधळले, झालं असं 

यावेळी शिंदे सरकारकडे बहुमताचा आकडा आहे की नाही हे ठरवले जाणार आहे. यासाठी गोव्यामध्ये मुक्कामी असलेल्या शिंदे समर्थक आमदारांना व्यक्तिश: हजर राहावे लागणार आहे. राज्याच्या विधानसभेत २८८ जागा आहेत. एका सदस्याच्या मृत्यूमुळं हा आकडा २८७ इतका झाला आहे. अशात बहुमतासाठी १४४ आमदारांचं पाठबळ असणं आवश्यक आहे. भाजपकडे सध्या १०६ आमदार आहेत. तर, शिंदे गटातील आमदारांची संख्या ३९ असून १२ अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर, बीवीएचे ३ आणि मनसेचा एक आमदारानेही समर्थन दिल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं भाजपकडे सध्या १६१ आमदारांचे पाठबळ आहे. तर, एकीकडे शिवसेनेचे १६, राष्ट्रवादीचे ५३, काँग्रेसचे ४४ आणि समाजवादी पक्षाचे २ आमदार आहेत. त्याव्यतिरिक्त एमआयएमचे २ आणि २ अपक्ष आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे. दरम्यान, शिवसेनेचे ठाकरे समर्थक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी