नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका गावात न्यूड डान्स शोचे आयोजन करण्यात आल्याच शनिवारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. या कार्यक्रमात अवघ्या १०० रुपयांमध्ये प्रवेश दिला जात असल्याने लोकांची तुफान गर्दी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी कार्यक्रम आयोजकांवर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्वरित कारवाई करत एसपी नागपूर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. (Nude dance program in Nagpur for 100 rupees, The night show storm in the villages)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एका न्यूड डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. 17 जानेवारी रोजी ही घटना घडली होती, ज्यामध्ये लोकांना 100 रुपये देऊन व्हिडिओ पाहण्याचे आमिष दाखवले जात असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करत एसपी नागपूर ग्रामीण विजय मगर यांनी तिघांना अटक केली आहे. यासोबतच एसआयटी तपासाचे आदेश दिले आहेत. ही घटना गावात घडल्याचं ग्रामस्थ आणि गावच्या सरपंचांनी फेटाळून लावल्याचं सांगण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्याचे डेप्युटी एसपी (मुख्यालय) संजय पुरंदरे म्हणाले, "पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पथक रविवारपासून तपास सुरू करेल."
17 जानेवारी रोजी गावातील ब्राह्मणी गावात गावकऱ्यांनी शंकरपट (बैलगाडी शर्यत) कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर आयोजकांनी तरुणांना १०० रुपये प्रतिव्यक्ती नग्न नृत्य पाहण्याचे आमिष दाखवले. अहवालात असे म्हटले आहे की व्हिडिओ उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावातील आहे, परंतु गावचे सरपंच रितेश अंबोन यांनी दावा केला आहे की हे प्रकरण त्यांच्या गावातील नाही. ते म्हणाले की, व्हायरल झालेला व्हिडिओ आमच्या गावचा नाही. 17 जानेवारीला आम्ही शंकरपटाचे आयोजन केले होते आणि त्यानंतर लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये कोणतीही नग्नता नव्हती.
मात्र, सरपंच खोटे बोलत असल्याचे डेप्युटी एसपी पुरंदरे यांनी सांगितले. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. स्थानिक पोलिस आणि शोचे आयोजक यांच्यात काही हातमिळवणी आहे का याचाही आम्ही तपास करत आहोत. उमरेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक यशवंत सोळसे यांनी सांगितले की, "आम्ही या प्रकरणी गावातील तिघांना अटक केली असून, कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा काही सहभाग होता की नाही?"