Amravati : दुर्दैवी ! दुमजली इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू, घटनास्थळाचा Video आला समोर

Building Collapse : अमरावतीमध्ये आज एक धक्कादायक घडला घडली. येथील प्रभाग चौकात एक दुमजली इमरात कोसळली आहे. त्यामध्ये अनेक जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Old building collapses in Amravati, many people feared trapped
Amravati : दुर्दैवी ! दुमजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, घटनास्थळाचा Video आला समोर ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमरावतीमध्ये दुमजली इमारत कोसळली
  • ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह बाहेर काढले आहेत.
  • तर ढिगाऱ्यात अडकलेल्या इतर नागरिकांसाठी बचाव कार्य सुरू

अमरावती : अमरावती शहरात रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. येथील प्रभात चौकातील दुमजली इमारत कोसळल्याने खळबळ उडाली आहे.  या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने बचावकार्य सुरू आहे. (Old building collapses in Amravati, many people feared trapped)

अमरावती शहरातील प्रभात चौकातील राजेंद्र लॉज ही जुनी दुमजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह काढण्यात आले आहेत. अमरावती महापालिककेने सुमारे चार वर्षांपूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याने संबंधितांना ती पाडण्याची नोटीस बजावली होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला.

या दुर्घटनेमुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला. तर आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. त्यानुसार महापालिकेची अग्निशमन आणि आपातकालीन यंत्रणेच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. या घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून स्थानिक नागरिक प्रशासनाला मदत करीत आहेत. घटनास्थळी खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके दाखल झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी