कुस्ती स्पर्धेच्या आदल्या दिवशी पैलवानावर ईडी, सीबीआयच्या धाडी, मर्दासारखे लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

६४ व्या 'महाराष्ट्र केसरी'त बाजी मारणाऱ्या कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याला स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची बाब समोर आली. त्यानंतर त्याला मदत देण्यावरुन राजकारण तापले आहे.

On the eve of the wrestling competition, the Chief Minister appealed to the wrestlers to fight like ED, CBI raids,
कुस्ती स्पर्धेच्या आदल्या दिवशी पैलवानावर ईडी, सीबीआयच्या धाडी, मर्दासारखे लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पृथ्वीराज पाटीलमुळेच्या रूपाने कोल्हापूरकडे महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा आली
  • कुस्ती स्पर्धेच्या बक्षिसाच्या रक्कमेवरुन राजकारण तापले
  • पृथ्वीराजला मदतीसाठी विविध पक्ष आणि नेत्यांमध्ये चढाओढ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली. दरम्यान, पृथ्वीराजला स्पर्धेचे बक्षिसाची एक लाख रुपयांची रक्कम न मिळाल्याने महाविकास आघाडी विरुध्द भाजप यांच्यामध्ये धोबीपछाड पहायला मिळत आहे. (On the eve of the wrestling competition, the Chief Minister appealed to the wrestlers to fight like ED, CBI raids, men)

अधिक वाचा : भिवंडीत मशिदीजवळ घर कोसळून महिलेचा मृत्यू, २ जखमी

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापूर राज्याच्या राजकीय आखाडा झाला आहे. आज महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मतदारांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

अधिक वाचा : भोंगा वाजवल्यावर राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्यावर राग कशाला येतो? : फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र  केसरी पृथ्वीराज पाटीलचे अभिनंदन करतानाच मुद्दा राजकीय रिंगणाकडे वळवला. राजकीय पक्षांच्या कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोर लढायला कोणी मर्द नाही. पण कुस्तीमध्ये भारतीय जनता पार्टी उतरली तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावर ईडी, सीबीआय इत्यादींच्या धाडी येतील. त्यामुळे मर्दाने मर्दासारखे कसं लढायचं हे कोल्हापूरची माती शिकवेल, असा उल्लेख करीत कुस्तीचा संदर्भ तपास यंत्रणांशी जोडला. 

साताऱ्यात शनिवारी झालेल्या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकर याचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटाकवला. कोल्हापूर जिल्ह्याला २१ वर्षानंतर मानाची चांदीची गदा मिळाली. मात्र स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने सोशल मिडियावर बोलून दाखवली. त्यानंतर त्याला मदत देण्यासाठी जणू काही स्पर्धाच सुरू झाली. यात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी