एअरटेलमध्ये एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर राहू शकता निश्चिंत, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

खासगी टेलीकॉम कंपनी एअरटेल (Airtel) ने एक  प्लॅन समोर आणला आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम, फ्री ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रूपयांचे कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून आणि फ्री विंक म्यूझिक ऍपही मिळतील.

One time recharge in Airtel can provide uninterrupted service for a whole year
प्रतिकात्मक फोटो   |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • एअरटेलने एक वर्षासाठी रिचार्ज प्लॅन समोर आणला आहे
  • १४९८ रूपयांमध्ये वर्षभरासाठी निश्चिंत होऊन ग्राहक घेऊ शकतात सुविधांचा आनंद
  • एअरटेलसोबत इतरही कंपन्यांनी आणले एकसारखे प्लॅन्स

नवी दिल्ली:  खासगी टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) ने एक नवीन प्लॅन समोर आणला आहे. हा रिचार्ज केल्यावर तुम्ही संपूर्ण वर्षासाठी, म्हणजेच ३६५ दिवसांसाठी निश्चिंत होता. या सोबतच तुम्हाला या प्लॅनमुळे अनेक सुविधा मिळतात. त्यानंतर पुढील ३६५ दिवसांसाठी तुम्हाला रिचार्ज आणि मोबाईलच्या सेवांबद्दल चिंता करायची फारशी गरज पडणार नाही. कोरोनाच्या काळात इंटरनेटची वाढती गरज पाहून अनेक टेलीकॉम कंपन्यांनी वर्षभरासाठीचे लॉंग टर्म प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत.  

या प्लॅनमध्ये हे मिळेल (Airtel Rs 1498 plan details) 

एअरटेलच्या या खास प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त एकदाच १४९८ रूपयांचे रिचार्ज करायचे आहे. या प्लॅनची वैधता किंवा टाईम लिमिट ही एक वर्ष किंवा ३६५ दिवसांची आहे. याचा अर्थ असा की १४९८ रूपयांमध्ये पूर्ण ३६५ दिवस तुम्ही या प्लॅनमधून मिळणाऱ्या सुविधांचा वापर करू शकता. या सुविधांमध्ये तुम्हाला एकूण २४ जीबी इंटरनेट डाटा मिळतो. त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० SMS मोफत मिळतात. 

दुसऱ्या कंपन्यांचे यासारखे प्लॅन्स (Similar plans of other companies)

रिलायन्स  जिओ ने एक १२९९ रुपयांचा प्लॅन समोर आणला आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना एकूण २४ जीबी इंटरनेट डाटा वापरता येतो.  एअरटेलपेक्षा याची किंमत कमी असली तरी या प्लॅनची वैधतासुद्धा कमी म्हणजेच ३३६ दिवसांची आहे. याचप्रमाणे व्हीआयचा प्लॅनही एअरटेलपेक्षा केवळ एक रूपयांनी महाग आहे. म्हणजे यातही तुम्हाला १४९९ रूपये खर्च करावे लागतात आणि त्याबदल्यात तुम्हाला २४ जीबी डाटा आणि ३६०० जीबी अमर्याद कॉलींग सुविधा मिळून जाते. 

एअरटेलच्या या प्लॅनचे इतर फायदे (More benefits in Airtel's Rs 1498 plan)


एअरटेलच्या १४९८रूच्या प्लॅनचे इतरही फायदे आहेत. बातम्यांतून मिळालेल्या माहितीनुसार या प्लॅनमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम, फ्री ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रूपयांचे कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून आणि फ्री विंक म्यूझिक ऍपही वापरायला मिळणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी