'इथे फक्त मराठीच चालणार... ' बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे मैदानात

marathi name plates must in maharashtra : राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन मराठी पाट्यांच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदनही केले होते. तसेच आता सरकारने कच खाऊ नये, असेही म्हटले होते. याविषयी विचारले असता संजय राऊत यांनी म्हटले की, कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना किंवा महाविकासआघाडीचे धोरण ठरत नाही.

'Only Marathi will work here ...' Raj Thackeray in the field ahead of BMC elections
'इथे फक्त मराठीच चालणार... ' बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे मैदानात   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन मराठी पाट्यांच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदनही केले
  • श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे.
  • बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाचे राजकारण तापले

मुंबई : राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्याचा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या निर्णय घेतला. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाचे राजकारण तापले आहे. यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेत महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाट्याचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे आहे. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असा इशारा दिला आहे. ('Only Marathi will work here ...' Raj Thackeray in the field ahead of BMC elections)

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. “या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरंतर आंदोलन करावं लागून नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच,”  “महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. ” 

व्यापारी संघटनांचा विरोध

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिरेश शाह यांनी ठाकरे सरकारने मराठी पाट्यांसंदर्भात केलेल्या या नव्या नियमांना विरोध केला आहे. व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्यास अडचण नसली तरी हा नियम लागू करताना मराठी नावांसंदर्भात घालण्यात आलेल्या अटींवर आक्षेप आहे. दुकानांवर मोठ्या आकारामधील पाट्या लावण्याला व्यापारी संघटनांचा विरोध असल्याचं शाह म्हणालेत. दुकानांना मराठी पाट्या लावू पण मोठ्या आकारातील पाट्यांची सक्ती नसावी, असं शाह यांनी म्हटले आहे. म्हणजेच मराठी नावं हे इतर भाषेतील नावांपेक्षा लहान अक्षरात असलं तरी ते ग्राह्य धरलं जावं असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

संजय राऊत यांनी सुनावले 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. व्यापारी संघटनांकडून निर्णयाला विरोध होत असल्याबद्दल विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी विरोध केला तर त्यांना सरळ करु असं म्हटलं.

“विरोध करतो म्हणजे काय… तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. विरोध कसला करत आहात…तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरु नका. तुम्हाला येथे राहायचं आहे, व्यापार करायचा आहे. हे काही व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही कोणाचं. करणार नाही म्हणजे काय?”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावलं.

एमआयएमचे सरकारला सवाल

तर  AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टिका कर निवडणुका जवळ आल्या की आठवतात मराठी पाट्या, मराठीचा अभिमान. मराठी फलकांमधून तुम्हाला (राज्य सरकार) काय मिळणार? नोकरी शोधण्यासाठी तरुणांची धडपड सुरू आहे. त्यांनी रोजगार देण्यासाठी कोणतीही योजना सुरू केली आहे का?:, असा सवाल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी