विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं तीस-तीस घोटाळ्यात नाव; काय आहे हा तीस-तीस घोटाळा

गावगाडा
भरत जाधव
Updated Jan 16, 2023 | 15:08 IST

30-30 scam : आता या घोटाळ्याची 'ईडी'ने (Ed) माहिती मागवली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोडकडे (Santosh Rathod) पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. ज्यात अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. 

 What is a thirty-thirty scam with the name of Danve
दानवेंचं नाव असलेला तीस-तीस घोटाळा आहे तरी काय   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तीस-तीस घोटाळ्यामुळे ठाकरे गटातील दानवे ईडीच्या रडारवर
  • आरोपी संतोष राठोडकडे पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या.
  • शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याचं मार्केटिंग करत तरुणाने शेतकऱ्यांना गंडा घातला.

मुंबई : ठाकरे गटातील आणि  विरोधी पक्षनेते ( Opposition leader)अंबादास दानवे (Ambadas Danve) हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण मागील वर्ष राज्यभरात गाजलेला तीस-तीस घोटाळ्यात दानवे यांचे नाव आले आहे. आता या घोटाळ्याची 'ईडी'ने (Ed) माहिती मागवली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोडकडे (Santosh Rathod) पोलिसांना तीन डायऱ्या मिळाल्या होत्या. ज्यात अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.  (Opposition leader Ambadas Danve's name in 30-30 scam, what is 30-30)

अधिक वाचा  :  सुधीर तांबेंना काँग्रेस पक्षातून काढले बाहेर

 मिळालेल्या माहितीनुसार, या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना मुख्य आरोपी संतोष राठोडकडे सापडल्या होत्या. ज्यात पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नावे होते. तर याच नावांच्या यादीत अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जर या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर, दानवे यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा होत आहेत. 

 घोटाळ्यात 'या' लोकांची नावं...
 

पोलिसांनी जप्त केलेल्या डायरीत असलेल्या गुंतवणूकदारांच्या नावाची यादीत एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावे आहेत. 

'या' राजकीय नेत्यांची नाव 

दानवे यांच्यासह या यादीत आणखी काही नेत्यांची नावे आहेत. ज्यात माजी पंचायत समिती सदस्य कृष्णा भानुदास चव्हाण, भाऊसाहेब तरमळे (राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष), मनोज पेरे (शिवसेना (ठाकरे गट) पैठण तालुकाध्यक्ष), राजू प्रल्हाद राठोड (शिवसेना पदाधिकारी), विजय अंबादास चव्हाण (राष्ट्रवादी नेते, माजी जिल्हापरिषद सदस्य),चंद्रकांत नामदेवरा राठोड (नगराध्यक्ष सोनपेठ परभणी) यांच्यासह अनेकांची नावे आहेत.  

अधिक वाचा  :  Winters Ladoo : थंडीच्या दिवसांत खा 3 प्रकारचे लाडू

काय आहे तीस-तीस घोटाळा 

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC) जमिनी गेलेल्या भागांत शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे, औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याचं मार्केटिंग या तरुणानं केलं.  त्यानंतर मात्र या तरुणानं पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरुवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. 

अधिक वाचा  : श्रेयस अय्यरची बॉलिंग बघून विराट कोहलीची 'बोलती बंद'

 लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यांमधून पैसे आणले जाऊ लागले, त्यामुळे लोकांचाही या भामट्यावर आंधळा विश्वास बसला. मग पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावांतील शेतकऱ्यांना राठोडने आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील राठोड गेल्या 8 महिन्यांपासून फरार आहे. 

प्रकरण कसं समोर आलं 

या फसव्या तीस-तीस स्कीममध्ये पैठण तालुक्यातील जांभळी गावातील एका महिलेने पैसे गुंतवले होते.  परंतु पैसे परत मिळण्याची आशा धुसर झाल्याने तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी