अखेर 18 तासांनंतर पुरातून 'त्या' 10 कामगारांची सुखरूप सुटका, NDRF ला मोठं यश

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 14, 2022 | 10:04 IST

Palghar Rains: पालघर जिल्ह्यात (Palghar District) ही पावसानं धुमाकूळ घातला आहे. पालघर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rains) देण्यात आला असून रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे.

Palghar Rain Update
अडकलेल्या 10 कामगारांची सुटका  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राज्यातल्या पालघर जिल्ह्यात (Palghar District) ही पावसानं धुमाकूळ घातला आहे.
  • पालघर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rains) देण्यात आला आहे.
  • पालघर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पालघर: राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. त्यात राज्यातल्या पालघर जिल्ह्यात (Palghar District)  ही पावसानं धुमाकूळ घातला आहे. पालघर जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rains) देण्यात आला असून रेड अलर्ट (Red Alert)  जारी केला आहे. मात्र अशातच पालघरमधील वैतरणा (Vaitarna River)  नदीत बहाडोली (Bahadoli) येथे 10 कामगार अडकल्याची बातमी समोर आली होती. आताच समोर आलेल्या माहितीनुसार या 10 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 

सध्या मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर आणि बहाडोली गावादारम्यान वैतरणा नदी पात्रात पुलाचं बांधकाम सुरू आहे. या उड्डाणपुलाचं काम सुरू असताना अचानक वैतरणा नदीला पूर आला. त्यामुळे हे सर्व कामगार नदी पात्रात अडकले होते. गेल्या 18 तासांपासून हे कामगार तिथेच अडकलेले होते. घटनेची माहिती मिळताच पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर NDRF ची टीमही दाखल झाली होती..या टीमकडून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आलं आणि त्यानंतर या अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. 

अधिक वाचा-  अमरावतीत कॉलराचा कहर! 8 दिवसात 181 रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यानं वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याच अंदाज न आल्यानं कामगार तिथे अडकले होते. 10 ही कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे.

पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट 

पालघर जिल्ह्याला पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पालघर महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वैतरणा नदीनं ही रौद्ररूप धारण केलं आहे. वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीतही सतत वाढ होत आहे. नदीच्या उपनद्या वरील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

वैतरणा नदी पात्रात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी जी आरा इन्फ्रा कंपनीच्या वतीनं बार्ज तैनात करण्यात आलेला आहे. नदी पात्राच्या मध्यभागी पिलर उभारण्यासाठी बार्जवर कामगार तैनात केलेत. काल दुपारी वैतरणा नदीच्या पात्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे नदी पात्राच्या मध्यभागी असलेल्या बार्जचा नांगर तुटला. त्यामुळे बार्जवर अडकलेल्या कामगारांनी मदतीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन कक्षानं कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ NDRF च्या पथकाला पाचारण केलं. त्यानंतर NDRFचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू केलं. या बचावकार्यादरम्यान अडकलेल्या 10 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी