Pankaja Munde: "मी थकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही" भगवान भक्तीगडावरुन पंकजा मुंडेंची गर्जना

Pankaja Munde dussehra melava live: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन मेळाव्याला संबोधित केलं. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं, पाहा...

Pankaja Munde dussehra rally melava live at bhagwan bhagtigad watch video details in marathi
पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा LIVE  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा
  • भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा
  • हा चिकलफेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा - पंकजा मुंडे

Pankaja munde dasara melava at Bhavwan Bhagtigad: भाजपच्या नेत्या गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव घाट येथे पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी म्हटलं, मेळावा म्हटलं... सभा म्हटलं तर एकमेकांवर टीका होते, टिप्पणी होते, चिखलफेक होते. या मेळाव्यात काय होणार असा प्रश्न होता तर मी मीडियाला म्हटलं, हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं हे आमच्या रक्तातच आहे. जे मुंडे साहेबांचे विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली मी त्यांच्यावर कधी बोलली का? कधी मी कुणाविषयी वाईट बोलली का? कधी खालच्या पातळीवर टीका केली का? कधीच नाही. ते आमच्या रक्तात नाही. (Pankaja Munde dussehra rally melava live at bhagwan bhagtigad watch video details in marathi)

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? 

पंकजा मुंडे म्हणाल्या, वरात्रोत्सवात देवीचे वेगवेगळे रुप असतात. सर्व देवींच्या समोर नतमस्तक होऊन माझ्या पदरात मला जर काही मागायचं असेल तर मी सांगेल या डोंगर कपाऱ्यातील गोरगरीब, घाम गाळणाऱ्या लोकांना चांगले दिवस येऊ दे. तुमची व्यवस्था करण्या इतकी माझी ऐपत नाही रे... खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता? चौपट झाला असता चौपट...

हे पण वाचा : संसारात वाद टाळण्यासाठी...

कोणासमोर कधीही झुकणार नाही

पंकजा मुंडे यांनी म्हटलं, संघर्ष कुणाला चुकलेला नाहीये. मुंडे साहेबांनाही काय संघर्ष नव्हता का? 40 वर्षांच्या राजकारणात फक्त साडे चार वर्षांची सत्ता मिळाली. त्या मुंडे साहेबांचा संघर्ष आपल्या समोर आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हिच माझी ओळख आहे. मी या वचनाला कधीही मुकणार नाही. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी