Pankaja Munde: बीड: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानिमित्त पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या गोपीनाथ गडावर पोहचल्यात. त्यानुसार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सोमवारी गोपीनाथ गडावर अर्धातास मौन पालन केलं. यानिमित्तानं पंकजा मुंडेंनी वडिलांसोबतच्या लहानपणीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.