Pankaja Munde's emotional post : पंकजा मुंडेंची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट, गोपीनाथ गडावरुन करणार हा संकल्प जाहीर

Pankaja Munde's emotional post भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) या दोन वर्षांपासून भाजपच्या (bjp) राज्य नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या सोशल मिडियावरील पत्राची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे.

Pankaja Munde's emotional post on social media will announce this resolution from Gopinath Gada
Pankaja Munde's emotional post : पंकजा मुंडेंची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट, गोपीनाथ गडावरुन हा संकल्प जाहीर करणार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पंकजा मुंडेंची सोशल मिडियावर पोस्ट
  • १२ तारखेला पंकजा मुंडे कोणता संकल्प जाहीर करणार
  • समर्थकांना केलं भावनिक आवाहन

Pankaja Munde's emotional post मुंबई : भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) या दोन वर्षांपासून भाजपच्या (bjp) राज्य नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुकी झालेल्या पराभवानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा असताना त्यांना डावलण्यात आले. त्यात त्यांनी आज सोशल मिडियावर टाकलेल्या एका पोस्टमुळे संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सोशल मिडियावर (social media) शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "१२ डिसेंबरला गोपीनाथ गडावरुन (Gopinath Gada) आपण एक संकल्प करणार आहोत, तो संकल्प तुम्ही पूर्ण करणार का? असा सवाल केला आहे. (Pankaja Munde's emotional post on social media will announce this resolution from Gopinath Gada)

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी हे पत्र लिहीलं आहे. "१२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील." त्याच वेळी १२ डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे.

विधानपरिषदेला पुन्हा डावललं

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना डावलून चार उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मला कसलीही अपेक्षा नाही. पदामुळं परिणाम होईल असं वाटत नाही. माझं काम सुरू आहे. मी राज्यभर फिरत आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. तरी पक्षातील ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी सोशल मिडियावर हे पत्र लिहीलं आहे. "१२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील." त्याच वेळी १२ डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे.

पंकजा मुंडेंच्या या पत्राची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर १२ तारखेला पंकजा मुंडे कोणता संकल्प जाहीर करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी