मोठा निर्णय अवजड वाहनांची वाहतूक बंद होणार

parashuram ghat closed for heavy vehicles during night : पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अवजड वाहनांची वाहतूक ठराविक तासांसाठी बंद आणि ठराविक तासांपुरतीच सुरू ठेवायची असा हा निर्णय आहे.

parashuram ghat closed for heavy vehicles during night
मोठा निर्णय अवजड वाहनांची वाहतूक बंद होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मोठा निर्णय अवजड वाहनांची वाहतूक बंद होणार
  • अवजड वाहनांची वाहतूक ठराविक तासांसाठी बंद आणि ठराविक तासांपुरतीच सुरू
  • वाहतूक कोणत्या वेळी खुली किंवा बंद राहणार याची माहिती घाटाच्या सुरुवातीस आणि शेवटी ठळकपणे झळकवणार

parashuram ghat closed for heavy vehicles during night : पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अवजड वाहनांची वाहतूक ठराविक तासांसाठी बंद आणि ठराविक तासांपुरतीच सुरू ठेवायची असा हा निर्णय आहे. दरड कोसळू नये म्हणून संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा जाळी बसविण्याचाही निर्णय झाला आहे. काही ठिकाणी जाळी बसविण्याचे काम झाले आहे आणि ज्या भागात आणखी सुरक्षा जाळी आवश्यक वाटत आहे तिथे तशी व्यवस्था तातडीने करण्याचा निर्णय झाला आहे.

मागील काही दिवसांपासून परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक विशिष्ट काळात बंद आणि विशिष्ट काळात सुरू ठेवायची असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी ही माहिती दिली. 

रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम केले आहे. यामुळे पावसाने जोर धरताच चिपळुण जवळचा परशुराम घाट धोकादायक झाला आहे. दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन वारंवार वाहतूक थांबवून रस्त्याची सुरक्षा तपासणी करावी लागत आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक सकाळी सहा ते संध्याकाळी सात या वेळेत एकेरी सुरू राहील. संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहील. 

पेण आणि रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस आणि परिवहन विभागाने घाटाची पाहणी केली. घाटातील वाहतूक सुरक्षित वाहतुकीचे नव्याने नियोजन करण्यात आले. अवजड वाहनांच्या वाहतुकीची वेळ निश्चित करण्यात आली. १४ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत ही व्यवस्था आहे. परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक सकाळी सहा ते संध्याकाळी सात या वेळेत एकेरी सुरू राहील. संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहील; अशी माहिती प्रशासनाने दिली. वाहतूक सुरू असताना दोन अवजड वाहनांमध्ये किमान ५० ते १०० मीटर इतके अंतर असावे. वाहनांचा वेग ताशी २० ते ३० किमी असावा अशा सूचना दिल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. सुरक्षिततेसाठी घाटात २४ तास गस्त आणि बचावकार्यासाठी आवश्यक ती सामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

  1. घाटातील वाहतूक कोणत्या वेळी खुली किंवा बंद राहणार आहे, याबाबतची माहिती घाटाच्या सुरुवातीस आणि घाटाच्या शेवटी ठळकपणे झळकवली जाणार. पनवेल, सिंधुदुर्ग, गोवा आणि व कोल्हापूर येथेही व्यापक प्रसिद्धी देणार.
  2. मुंबईहून येणारी जास्तीत जास्त वाहने, पनवेलहून मुंबई-पुणे महामार्गावरून तसेच गोव्यावरून येणारी वाहने पाली (जि. रत्नागिरी) येथून रत्नागिरी-कोल्हापूर-पुणे या मार्गे वळविण्यात येतील.
  3. बंदीच्या कालावधीत वाहतूक चिरणी-आंबडस- चिपळूण या पर्यायी मार्गाने वळवली जाईल.
  4. चिपळूणकडून खेडकडे येणाऱ्या वाहनांसाठी कळंबस्ते – आंबडस – शेल्डी – आवाशी, तर चिपळूणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पीरलोटे – चिरणी – आंबडस फाटा – कळंबस्ते फाटा या मार्गाने एकेरी वाहतूक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी