"पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून तिकीट देणार नाही". फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उत्पल पर्रीकर यांच उत्तर

Goa Election 2022 : गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधील नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी तिकीट वाटपात दुर्लक्ष केल्यामुळे बंडखोरी वृत्ती स्वीकारली आहे. पक्षाचा प्रामाणिकपणा आणि चारित्र्यावर विश्वास आहे का, असा सवाल त्यांनी गुरुवारी भाजपला केला. पणजी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना तिकीट दिल्यास आपण गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले.

"पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून तिकीट देणार नाही". फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उत्पल पर्रीकर यांच उत्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये नाराजी
  • माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी तिकीट वाटपात दुर्लक्ष केल्यामुळे बंडखोरी
  • पक्षाचा प्रामाणिकपणा आणि चारित्र्यावर विश्वास आहे का, असा सवाल

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपमधील (BJP) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मोनहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal parrikar) हे पणजी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. पण त्यांना भाजप उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. यावरुन काल गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की उत्पल परिकर केवळ मनोहर परिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. यावर उत्पल यांनी प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. ("Parrikar's son will not give a ticket." Utpal Parrikar's reply after Fadnavis' statement)

पणजीतून बाबुश मोंसरात यांना उमेदवारी

विधानसभा निवडणूकीमुळे गोव्यात दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहे. सध्या गोव्यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री मोनहर पर्रीकर यांचे ते सुपुत्र उत्पल पर्रीकर हे नाव चर्चेत आहेत. पणजी विधानसभा मतदारसंघात मागच्या 30 वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होतो. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला परिकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. त्यानंतर बाबुश यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर उत्पल यांनी आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली पाहिजे नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल परिकर यांनी जाहीर केले.

अमित शहांकडून मनधरणी

पणजीतून भाजपने आमदार बाबुश मोंसरात याना तिकीट देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.त्यामुळे नाराज उत्पल यांची गृहमंत्री अमित शहा यांनी मनधरणी करुनही उत्पल आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मनोहर परिकर यांनी पणजीत केलेली विकासकामे, पणजीतून मनोहर परिकर यांना मानणारा त्यांचा मतदारवर्ग आणि पणजी आणि गोव्यासाठी त्यांचे असलेले योगदान याच्या जोरावर त्यांचे पुत्र उत्पल परिकर सध्या भाजपकडून पणजीसाठी तिकीट मागत आहेत.

उत्पल आपल्या भूमिकेवर ठाम

यावर गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की उत्पल परिकर केवळ मनोहर परिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. याशिवाय उत्पल यांची वेगळी ओळख आणि कामही नसल्याचे ही फडणवीस पुढे म्हणाले होते. यावर उत्पल यांनी प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी