सीमाभागातील मराठी बांधवांच्या मदतीला पवार! महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सिल्व्हर ओकवर भेट

maharashtra ekikaran samiti leaders meet sharad pawar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेनंतर कर्नाटकमध्ये झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मराठी बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Pawar to help Marathi brothers in border areas! A delegation of Maharashtra Unification Committee visited Silver Oak
सीमभागातील मराठी बांधवांच्या मदतीला पवार! महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सिल्व्हर ओकवर भेट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र युवा समितीच्या वतीने शरद पवारांची घेतली भेट
  • सीमाभागात कर्नाटक शासनाकडून मराठी बांधवावर होत असलेल्या दडपशाही ची माहिती दिली
  • रोहित पवारांनी विधानसभेत कर्नाटकमधील मराठी बांधवांसाठी आवाज उठवला

मुंबई : कर्नाटकमधील बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सीमाभाग आणि महाराष्ट्रात उमटले आहेत. या घटनेनंतर सीमाभागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून (karnatak goverment) सुरू असलेल्या अत्याचारा पाडा आज महाराष्ट्र एकिकरण युवा समितीच्या (maharashtra ekikaran samiti) शिष्टमंडळाने  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (sharad pawar) यांच्यासमोर मांडला. (Pawar to help Marathi brothers in border areas! A delegation of Maharashtra Unification Committee visited Silver Oak)

मुंबईत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती च्या शिष्टमंडळाने आज सिल्व्हर ओक येथे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला मदतीचे आश्वासन दिले. लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेईल, यासाठी आपण प्रयत्न करु, असे पवार यांनी म्हटले.

त्यानंतर समितीच्यावतीने आमदार रोहित पवार यांनीही निवेदन देण्यात आले. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करुन महाराष्ट्र सरकारने ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी केली. अन्यथा महाराष्ट्रातल्या तरुणांना रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही रोहित पवारांनी दिला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबने नंतर बेळगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला तर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे येथे कनार्टकातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर कर्नाटक सरकारने धर्मवीर संभाजी चौकात जमलेल्या मराठी तरुणांवर बेळगावच्या विविध पोलीस ठाण्यात गंभीर  खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच देशद्रोह असा गंभीर गुन्हा कानडी संघटनांच्या दबावाखाली येऊन घालण्याचा विचार कर्नाटक सरकारने चालविला आहे

या प्रकरणी आपण लक्ष घालून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या शी चर्चा करून मराठी बांधवावर होत असलेली दडपशाही थांबवून  मराठी तरुणावर घातलेले गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी युवा समिती च्या वतीने पवारांकडे करण्यात आली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी