पोलिसांकडून लष्करातील जवानालाच मारहाण, आपण नेमके चुकतोय कुठे?

गावगाडा
Updated Mar 25, 2020 | 19:17 IST

संचारबंदी असताना देखील घराच्या बाहेर उभ्या असलेल्या लष्करातील एका जवानाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. 

police beaten the army jawans where exactly do we mistake
पोलिसांकडून लष्करातील जवानालाच मारहाण, आपण नेमके चुकतोय कुठे?  |  फोटो सौजन्य: Times Now

सातारा: कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून बाहेर फिरणाऱ्या लोकांना पोलीस बेदम चोप देत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. लोकांना पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीबाबत चिंताही व्यक्त केली जात आहे. सामान्य नागरिकांचे तर सोडाच मात्र पोलिसांनी लष्करातील एका जवानाला देखील झोडपून काढले आहे. 

दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की, दत्ता अंकुश शेंडगे हे मूळ सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील पळसावडे गावाचे रहिवासी आहेत. सध्या त्यांची नेमणूक जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे आहे. गेल्या अठरा वर्षांपासून ते लष्करात कार्यरत आहेत. 

जवान दत्ता शेंडगे हे ३० दिवसाच्या सुट्टीवर आपल्या गावी आले आहेत. २४ मार्च रोजी दत्ता शेंडगे हे आपल्या घरासमोर साफसफाई करत होते. दरम्यान, गावातील एक डॉक्टर दत्ता शेंडगे यांच्या घरासमोरून जात असताना. त्यांनी दत्ताला पाहून विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान मसवड पोलिसांची गाडी तेथे आली आणि पोलिसांनी दत्ता शेंडगे यांना घराबाहेर काय करतोस? असे विचारले. त्यावेळेस दत्ता शेंडगे हे आपल्या घरात जाऊ लागले. पोलिसांनी गाडीतून खाली  उतरताच घरात जाणाऱ्या दत्ता शेंडगे यांच्यावर लाठीमार सुरू केला. मारहाण होत असताना दत्ता शेंडगे हे पोलिसांना मी फौजी आहे सांगत होते. तरीदेखील पोलिसांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. उलट गाडीतील बसलेल्या इतर पोलिसांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असताना जवानाची पत्नी आणि आई त्याठिकाणी पळत आले. मात्र त्यांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. 

दरम्यान, या मारहाणीत दत्ता शेंडगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 'मी फौजी असताना देखील मला मारहाण केली जाते. तर सामान्य जनतेसोबत पोलीस कशी वागणूक करत असेल? हा असा सवाल देखील दत्ता शेंडगे यांनी उपस्थित केला आहे. 

आपलं नेमकं चुकतंय कुठे? 

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण असल्याने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे  मात्र, असं असलं तरी अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना नाईलाजस्तव मारहाण करावी लागत आहे. पण यामुळे काही निष्पाप लोकांना देखील मार खावा लागत आहे. त्यामुळे आता एकूणच या परिस्थितीबाबत प्रशासनाने काही तरी स्पष्टता आणणं गरजेचं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...