नाशकात लाऊडस्पीकरवर वाजवली 'हनुमान चालिसा', सर्व लाऊडस्पीकर आणि डीजे काढून टाकण्याचे आदेश

Maharashtra Loudspeaker case : आता मशिदींमध्ये लाऊडस्पीकरच्या वापरावरून वाद वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकरच्या आवाजावर तीव्र आक्षेप नोंदवला होता आणि हा आवाज थांबवला नाही तर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसाही पाठ करू, असे सांगितले होते. त्यानंतर मुंबईनंतर नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काही मंदिरात हनुमान चालिसा म्हणण्यात आली.

Politics heats up on 'Hanuman Chalisa', Maharashtra govt orders removal of all loudspeakers and DJs
'हनुमान चालीसा' वरून राजकारण तापलं, सर्व लाऊडस्पीकर आणि डीजे हटवण्याचे महाराष्ट्र सरकारचे आदेश ।   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांनी मशिदीतून लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी
  • मनसे कार्यकर्ते आक्रमक
  • मुंबई तसेच नाशिकमधील मंदिरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा

मुंबई : महाराष्ट्रातील मशिदींवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरवरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या वक्तव्यानंतर ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. भजने वाजवली जातात. त्यानंतर सरकारने कारवाई सुरू केली आहे.

अधिक वाचा ; Mumbai Local : लोकलने प्रवास करताय? आता प्रवास करताना कोणाचीच होणार नाही अडवणूक, वाचा कारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून मशिदींमध्ये अजानला विरोध करण्याची धमकी दिल्यानंतर, त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला मुंबईतील असल्फा परिसरात अशा कृत्याचा प्रयत्न केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर नाशकातही भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यात आली. नाशकातील भद्रकाली परिसरात मनसेने भोंगे लावले. 


नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की, आम्ही सर्व लाऊडस्पीकर आणि डीजे बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही, असे ते म्हणाले. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या सूचनांचे पालन करू.

अधिक वाचा ; Uddhav Thackeray : पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणार्‍या कंपन्यांचा होणार फायदा

विविध समाजांमध्ये फूट पाडण्यासाठी विधाने करणाऱ्यांवर पोलिस नक्कीच कारवाई करतील, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीतून लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी