हिमंता बिस्वा सरमा, हार्दिक पटेल यांच्या वाटेवर पृथ्वीराज चव्हाण?, राहुल गांधींवर उपस्थित केला प्रश्न

prithviraj chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या चार वर्षांत पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली नसल्याचं म्हटलं आहे. चव्हाण यांनी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पॉडकास्टला सांगितले की, गेल्या महिन्यात उदयपूर येथे झालेल्या काँग्रेस संमेलनात कोणतेही 'चिंतन' किंवा 'स्व-मूल्यांकन' झाले नाही.

Prithviraj Chavan on the path of Himanta Biswa Sarma, Hardik Patel ?, Question presented to Rahul Gandhi
हिमंता बिस्वा सरमा, हार्दिक पटेल यांच्या वाटेवर पृथ्वीराज चव्हाण?, राहुल गांधींवर उपस्थित केला प्रश्न ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काॅंग्रेस नेतृत्वावर निशाणा
  • उदयपूरमध्ये काँग्रेसने नुकत्याच आयोजित केलेल्या चिंतन शिबिरात कोणतेही "चिंतन" नव्हते.
  • राहुल गांधी भेटण्यासाठी वेळ देत नसल्याची तक्रार

मुंबई : गुजरात काँग्रेसचा मोठा नेता हार्दिक पटेलने  पक्षाचा राजीनामा देऊन आज भाजपमध्ये प्रवेश केला दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गेल्या चार वर्षांपासून राहुल गांधींच्या भेटीची वेळ मिळाली नसल्याचे वक्तव्य केल्याने काॅंग्रेस वर्तुळात खळबळ उडून दिली आहे.

अधिक वाचा : 

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात ४५५९ कोरोना Active, आज १०४५ रुग्ण, १ मृत्यू

एकेकाळी आसामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी थेट राहुल गांधींच्या गांभीर्यीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेस सोडल्यानंतर हिमंता यांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी अनेक वेळा विनंती करूनही वेळ दिला नसल्याचा आरोप केला होता. एकदा भेटल्यावरही त्यांचे ऐकण्याऐवजी राहुल गांधी त्यांच्या 'पिड्डी' या कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत होते. राहुल गांधींचा कुत्रा पिड्डी ज्या प्लेटमधून बिस्किटे खात होता, त्या प्लेटमधून काही काँग्रेस नेतेही बिस्किटे खात असल्याचा दावा सरमा यांनी केला होता.

अधिक वाचा : 

BULDHANA | फडणवीसांना खूष करण्यासाठी काही लोकांनी सामाजिक राजकारण बिघडविण्याची सुपारी घेतली -  आमदार अमोल मिटकरी
हार्दिक पटेलनेही त्याचाच पुनरुच्चार केला आहे. होय, हार्दिकने सोनिया गांधींना पत्रात लिहिले आहे की, 'जेव्हाही मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाला भेटलो, तेव्हा गुजरातमधील जनतेच्या आणि पक्षाच्या समस्या ऐकण्यापेक्षा नेतृत्वाचे लक्ष माझ्या मोबाइलवर अधिक असल्याचे दिसून आले.' दोन राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता उरलेली असताना, 2024 च्या लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये येत्या एक वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत, पक्ष नेतृत्वाच्या गांभीर्याचा प्रश्न आहे. नवीन विचारसरणीचा आधार वाटतो.

अधिक वाचा : 

Weather Update: मान्सूनने धरला जोर, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस

आणि आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखतीत सांगितले की, “मी जेव्हाही दिल्लीत असतो तेव्हा अधूनमधून डॉ. मनमोहन सिंग यांना भेटतो. पण त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी राहिली नाही. त्यांनी नेहमीच आदरातिथ्याची भावना जपली आहे आणि नेहमी बोलण्यासाठी तयार आहे. मी जेव्हा कधी वेळ मागितली तेव्हा मी सोनिया गांधींनाही भेटतो. पण बऱ्याच दिवसांपासून मी राहुल गांधींना भेटलो नाही… मला वाटतं त्यांना भेटून चार वर्षे झाली आहेत. पक्षनेतृत्वाला भेटायला हवी तेव्हा उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.

अधिक वाचा : 

MPSC Result 2022: PSI पूर्व परिक्षा २०२१ रिजल्ट जाहीर, ही घ्या Direct link, जाणून घ्या मुख्य परिक्षा कधी ?

पृथ्वीराज चव्हाण हे पक्षातील नाराज गट G -20 चे सदस्य आहेत. जे अलीकडच्या काळात पक्षाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघटनेत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावर काॅंग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काॅंग्रेसचा राजीनामा देऊन समाजवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार आहे. हे सरकार बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱे पृथ्वीराज चव्हाण बाजूला पडले आहेत. तसेच नाना पटोले यांच्या खांद्यावर काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पदही अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी