19 वर्षीय तरूणी गेली उपचारासाठी; डॉक्टरनं असं काही केलं की, हादरलं पुणं

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 08, 2022 | 11:01 IST

Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

pune crime news
पुण्यात विकृतीचा कळस 
थोडं पण कामाचं
  • पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.
  • संबंधित डॉक्टरविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. उपचारासाठी रूग्णालयात गेलेल्या एका 19 वर्षीय तरूणीवर डॉक्टरनंच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतंकच काय तर त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे या आरोपी डॉक्टरनं पीडित तरूणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले. 

हा नराधम डॉक्टर एवढंच करून थांबला नाही तर याविषयी कोणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. ही सर्व घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टरविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा- 1996 सालचं 'ते' प्रकरण राज बब्बर यांच्या आलं अंगाशी, MP-MLA कोर्टानं दिला मोठा निर्णय

नेमकं काय घडलं? 

पुण्यात 19 वर्षीय तरूणी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरनं तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडत असताना तरूणीनं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी डॉक्टरनं तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला. हा कृत्य करत असताना डॉक्टरनं तरूणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. 

अधिक वाचा- Maharashtra Rain Update: आज राज्यातल्या 'या' भागात रेड अलर्ट... तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना किंवा आणखी कोणाला माहिती दिल्यास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र तरूणी धमकीला न घाबरता कुटुंबियांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर कुटुंबियांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर 45 वर्षीय डॉक्टरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

पुण्यातला दुसरा धक्कादायक प्रकार 

पुण्यात 28 वर्षीय तरूणीला विवाहाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. विवाहित असताना ही 28 वर्षीय तरुणीला आरोपीनं लग्न करण्याचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पुण्यातल्या भारती विद्यापीठ परिसरातील पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडित तरूणी पुण्याची असून आरोपी हा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी