पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात एका दुमजली इमारतीची भिंत कोसळली आहे. नाना पेठेत ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांकडून बचावकार्य तातडीनं सुरू करण्यात आलं.
रात्री पुण्यातील नाना पेठेत दुमजली इमारतीची भिंत कोसळली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. तर दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं.
Maharashtra | 2 injured and 2 rescued after a wall of two-storey building collapsed in Nana Peth area of Pune city, late last* night: Pune Fire Brigade pic.twitter.com/u8bqEtkc0J — ANI (@ANI) July 12, 2022
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आज अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात शहरामध्ये 35 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. काल दिवसभर पुणे शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरूच आहे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची घराबाहेर पडताना तारांबळ उडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहन चालकांना देखील अडचणी निर्माण होत आहेत. शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस म्हणजेच गुरूवारपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.
राज्यातल्या पावसाची सद्यस्थिती
आजही राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम आहे. रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.