पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून दोन दिवसांपासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार का? या विषयी चर्चा सुरु असताना मंगळवारी दुपारी एक वाजता लोहगाव, पुणे येथील विमानतळावर मोदींचे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळीचा एक फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अधिक वाचा :
अजित पवारांना करुन दिलं नाही मोदींसमोर भाषण, नेमकं काय घडलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी देहू, पुणे येथील श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि सायंकाळी मुंबई येथील राजभवनमधील संग्रालयाच्या कार्यक्रमासाठी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात उपस्थित होते. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट आदींंची उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी मोदींना हात जोडून नमस्कार करताच पंतप्रधानांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. दादांची विचारपूस केली. त्यानंतर इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर विमानतळावरून देहूकडे मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून देहूमध्ये आगमन होताच येथे एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी त्यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा केला. मोदी सभास्थळी दाखल होताच त्यांचा तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ घालून नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.तसेच वारकरी आणि भाविकांशी ते संवाद साधला.
अधिक वाचा :
मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवत होते, समल्यावर उद्धव ठाकरे संतापले
विमानतळावरील स्वागत स्वीकारून पंतप्रधान मोदी देहूच्या दिशेने रवाना झाले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर ठेवलेले छायाचित्र समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरले. हे छायाचित्र मोठ्याप्रमाणात व्हायरला झाले.