शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये सामना, रत्नागिरीत रामदास कदम विरुध्द अनिल परब यांच्यातील वाद चव्हाट्यावर

ramdas kadam slams anil parab : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण मुलं निर्णय घ्यायला मोकळी आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

Quarrel between two Shiv Sena leaders, Ramdas Kadam vs. Anil Parab in Ratnagiri
शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील सामना, रत्नागिरीत रामदास कदम विरुध्द अनिल परब यांच्यातील वाद चव्हाट्यावर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की, अनिल परब
  • शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले
  • रामदास कदमला संपविण्याचा घाट घालत आहेत

रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेत्यांना पुरावे दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शिवसेना नेते रामदास कदम (ramdas kadam) यांच्यावर मातोश्रीची (matoshri) नाराजी ओढावली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कदम पिता-पुत्राच्या समर्थकांना डावलण्यात आल्याने घुसमट झालेल्या रामदास कदम यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनिल परब (anil parab) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने शिवसेना (shivsena) नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. (Quarrel between two Shiv Sena leaders, Ramdas Kadam vs. Anil Parab in Ratnagiri)

या पत्रकार पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाना साधला.  परब यांनी अनिल परब हे पक्षासोबत गद्दारी करत आहेत. शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घातला आहे. कोकणातून शिवसेना संपवण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना बाजू ठेवले जात आहे. राजकारणातून संपवण्याचा डाव आखला जात आहे. पक्षात ते कोणाचेही एकत नसतील तर सध्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आहेत की, अनिल परब असा सवाल कदम यांनी केला. 

दोन वर्षांत फक्त एकदाच उद्धव ठाकरेंना भेटलो. मी मातोश्रीवर गेलो नाही. मंत्रालयात गेलो नाही. 'अनिल परब म्हणजे पक्ष असेल तर त्याच्यावर टिका म्हणजे पक्षविरोधी भूमिका असेल तर पक्षाने कारवाई करावी. मात्र, मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण मुलं निर्णय घ्यायला मोकळी आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली तरी, मी शिवसैनिक म्हणून जगेन, असंही ते म्हणाले. लवकरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरच निर्णय जाहीर करीन.

रामदास कदम यांनी म्हटले आहे की, उद्धवजी पुन्हा आपल्याला हात सोडून सांगतो की, आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्रिपद दिले. ते कुणाची घरे फोडणे, शिवसेना नेत्याला इतर पक्षांच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून संपवणे अशी कामे करत आहेत. कृपा करून त्यांना थांबायला सांगावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

यावर अनिल परब यांना यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असं परब यांनी म्हटलं आहे. 

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी