राज्यातील अनेक भागात गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांला फटका

maharashtra weather alert : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात गारा पडल्या. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

Rabi crops have been affected due to unseasonal rains and hail in many parts of the state
राज्यात अनेक भागात गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांला फटका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्याच्या अनेक भागात आज पुन्हा गारपीट झाली
  • बीड, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांत गारपिटीमुळे पिकांचं नुकसान
  • शेतकरी हवालदिल

मुंबई : राज्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची कामे सुरू असताना मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक गावांमध्ये गारपिटीनेही झोडपून काढलं आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला. यामध्ये धाराशिव, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसंच परिणामी शेतातील उभी पिकं उद्ध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात प्रचंड वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Rabi crops have been affected due to unseasonal rains and hail in many parts of the state)

अधिक वाचा : सोन्याचे पोहचले ऑल टाईम हाय अगदी जवळ, जाणून घ्या आता काय भाव

हवामान विभागाने येत्या काही दिवसांत भारताच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अधिक वाचा : बाबा बागेश्वर मुंबईत येताच काय झालं?

मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, जालना तसेच उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागांतही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात गारा पडल्या. या पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारांचा देखील वर्षाव होत होता. यात आंबा, कांदा, ज्वारी, गहू या पिकांचे नुकसान झाले. पाऊस उघडल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच नुकसानीचे स्वरूप लक्षात येईल. या गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला असून हाता-तोंडाशी आलेलं पीक या गारपिटीने गेलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी