Video: हातात मशाल होऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री; शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रवासाला सुरुवात

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये दाखल झाली. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Rahul Gandhi's 'Bharat Jodo Yatra' reaches Maharashtra, Shiv Sena, ncp can participate
हातात मशाल होऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री; शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रवास सुरुवात ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली
  • 15 विधानसभा आणि 6 लोकसभेच्या मतदारसंघातून जाणार
  • राहुल गांधींच्या दोन जाहीर सभा होणार

नांदेड : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी ६१ व्या दिवशी महाराष्ट्रात दाखल झाली. हा प्रवास महाराष्ट्रात १४ दिवस चालणार आहे. तेलंगणातील कामारेड्डी येथून निघालेली ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून रात्री ९ वाजताच्या सुमारास महाराष्ट्रात पोहोचली. दोन्ही राज्यांच्या सीमेवर तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज देण्यात आला. देगलूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राहुल गांधींनी अभिवादन केले. (Rahul Gandhi's 'Bharat Jodo Yatra' reaches Maharashtra, Shiv Sena, ncp can participate)

अधिक वाचा : Pui Bridge : मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड पुई पूल धोकादायक; सावित्री पूलाप्रमाणे दुर्घटनेची भिती, नवीन पुलाची मागणी

तेलंगणातून ‘भारत जोडो यात्रा’ नांदेडमध्ये पोहोचली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत पुढे जाताना दिसले. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 375 किलोमीटरचा प्रवास केला आहे. स्वागतानंतर सोमवारी रात्री यात्रेला पुन्हा सुरुवात होणार असून त्यात पादचारी एकतेची मशाल घेऊन जाताना दिसले. यावेळी या यात्रेत  नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, यांच्यासह अनेक काॅंग्रेस नेते सहभागी झाले आहेत.

अधिक वाचा : राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा आज महाराष्ट्रात पोहोचणार, असा असणार यात्रेचा मार्ग

राहुल गांधी हे 14 दिवस 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघातूजन प्रवास करणार आहे. त्यादरम्यान, दि. 10 नांदेड आणि दि. 18 नोव्हेंबरला बुलढाण्यातील शेगाव येथे सभेला संबोधित करणार आहेत. 14 दिवसांचा प्रवास करून ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात जाणार आहे. 

या यात्रेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्यावतीने आदित्य ठाकरे आणि इतर नेते  सहभागी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार होते. मात्र, शरद पवार आजारपणामुळे त्यांना येता येणार नाही. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी