Raigad News: मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर, कोलाडमध्ये आज चक्काजाम

Raigad Journalists Protest:रायगड प्रेस क्लबच्या वतीने (Raigad Press Club) साखळी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. आज कोलाड नाक्यावर हे आंदोलन केलं गेलं.

Raigad Journalists Protest
मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर, कोलाडमध्ये आज चक्काजाम  
थोडं पण कामाचं
  • आज रायगडमध्ये (Raigad) पत्रकारांनी ( journalists) रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे.
  • महामार्गाची (highway) झालेली दुरावस्थाविरोधात पत्रकारांनी आवाज उठवला आहे.
  • मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत भयावह अशी दुरावस्था झाली आहे.

जान्हवी जाधव- रायगड: Raigad Journalists Protest: आज रायगडमध्ये (Raigad) पत्रकारांनी ( journalists)  रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. महामार्गाची (highway) झालेली दुरावस्थाविरोधात पत्रकारांनी आवाज उठवला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत भयावह अशी दुरावस्था झाली आहे. महामार्गाच्या झालेल्या दुरावस्था विरोधात पत्रकारांनी आंदोलन केलं आहे. रायगड प्रेस क्लबच्या वतीने (Raigad Press Club)  साखळी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. आज कोलाड नाक्यावर हे आंदोलन केलं गेलं. मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाने आजवर हजारो निष्पाप जीवांचे बळी घेतलेत. 

अधिक वाचा- Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी, केवळ असे करा सेवन

NH 66 या  महामार्गाच्या पळस्पे  ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील 13 वर्षांपासून रेंगाळत सुरू आहे. पावसाळ्यात महामार्ग देखभाल दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्यासाठी कोटीच्या कोटी खर्च केले. मात्र आज महामार्गाची जैसे थे परिस्थिती झाली आहे.

जीवघेणे खड्डे आणि धुळीच्या समस्येने नागरिक बेजार झालेत.  जीव मुठीत घेऊन प्रवाशी आणि वाहनचालकांना प्रवास करावा लागतोय. महामार्ग दर्जेदार आणि सुस्थितीत यावा यासाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वारंवार समस्या मांडून लक्ष वेधलं आहे. मात्र आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार आंदोलने देखील केली. महामार्गाची जलद सुधारणा व्हावी यासाठी आज पत्रकारांनी कोलाड नाक्यावर आंदोलन केलं. एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.  यावेळी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 


 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी