Weather Forecast Today: मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण, आजही पाऊस पडेल का? स्कायमेट ने दिली मोठी अपडेट

Maharashtra Weather Update Today: मागील काही दिवसांपसून राज्यभरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Rain chances in Vidarbha including Marathwada, know the weather in your district
Weather Forecast Today: मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण, आजही पाऊस पडेल का? IMD ने दिली मोठी अपडेट 
थोडं पण कामाचं
  • येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता
  • मराठवाडा आणि विदर्भातील या भागात ढगाळ वातावरण
  • मेघगर्जनेसह दमदार पावसाची उपस्थिती

Maharashtra Weather Update Today: राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Weather Forecast) संकट निर्माण झाले आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह दमदार पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. खास करुन गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणारआहेत. 

अधिक वाचा : Mango । ‘पुणे तिथे काय उणे’! आता आंबेही EMI वर विकत घेता येणार

गुरुवार- पावसाची शक्यता असलेले जिल्हे

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ 

शुक्रवार- कोणकोणत्या विभागाता पावसाची शक्यता?

मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता. सोबतच कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्येही पावसाची सरी. दरम्यान, नाशिक, अहमदनगर, पुणे येथेही तुरळक पावसाची शक्यता.

अधिक वाचा : MHADA Konkan Lottery 2023: म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या काय आहे शेवटची तारीख

यलो अलर्ट असलेले जिल्हे

हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यात अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी