राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आज 22 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट

गावगाडा
भरत जाधव
Updated Oct 17, 2021 | 09:38 IST

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात  (Arabian sea) दोन वेगवेगळे हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झाले (Low pressure area) आहे.

Rainfall increased in the state
वरुण राजाचा राज्यात अजून दोन दिवस मुक्काम   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केरळमध्ये अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे.
  • आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे.
  • राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रात  (Arabian sea) दोन वेगवेगळे हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झाले (Low pressure area) आहे. दोन्ही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होतं असल्याने याचा मान्सूनवर (Monsoon) परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यात दोन ते तीन दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला आहे.  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारी केरळात धुव्वाधार पाऊस झाला आहे. यामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे. आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने (IMD) हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे.

हवामान खात्याने आज नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काल विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. दरवर्षी 17 ऑक्टोबरला मान्सून राज्यातून परततो. 6 ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर, दरम्यान अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे परतीच्या वाटेवरील पाऊस महाराष्ट्र आणि ईशान्यकडील काही राज्यात अडकला आहे. त्यामुळे राज्यातील आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. तर पहाटे हवामानात किंचितसा गारवा जाणवत आहे. काल महाबळेश्वरमध्ये 15.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सातारा (18.7), नाशिक (16.3), सोलापूर (18.6), औरंगाबाद (18.4), पुणे (18.4) आणि बारामती 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी