मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या धक्क्यानंतर आता शिवसेनेने संसदीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने लोकसभेत भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची मुख्य व्हीआयपी म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असे पत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले होते. (Rajan Vichare's Chief Whip in Lok Sabha replaces Bhavana Gawli)
अधिक वाचा : उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून महादेव पिंड घातली पाण्याखाली! पहा व्हिडीओ
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेच्या चीफ व्हीपपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र दिल्याने शिवसेनेचे १२ खासदारही बंड करू शकतात, अशी चर्चा होती.
अधिक वाचा : CM Eknath Shinde : वारकर्यांसाठी टोलमाफी आणि एसटीच्या ७०० बसेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
याआधी मंगळवारी शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले होते. त्यात राहुल शेवाळे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती.
अधिक वाचा : Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १९९८१ कोरोना Active, आज ३१४२ रुग्ण, ७ मृत्यू
आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचं पत्र पाठवून दिलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.