Konkan Raliway Updates : कोकणकन्या एक्सप्रेस तब्बल पाच तासांनी मार्गस्थ, पण मंत्र्यांच्या दौऱ्यांच गणित बिघडलं

गावगाडा
भरत जाधव
Updated Nov 25, 2022 | 09:58 IST

कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळं कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली होती.  मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ही घटना घडली. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या होत्या.

 Raliway Updates : Konkan Kanya Express was on its way after almost five hours
कोकणकन्या एक्सप्रेसनं मंत्र्यांच्या दौऱ्याचं गणित बिघडवलं   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • वाहतूक विस्कळीतपणाचा त्रास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना झाला.
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर
  • चंद्रशेखर बावनकुळे कोकण कन्या एक्स्प्रेसनं प्रवास करत आहेत.

रत्नागिरी (सचिन कांबळे ) : कोकण रेल्वे मार्गावरील (Konkan Railway) रत्नागिरीजिल्ह्यातल्या दिवाणखवटी (Diwankhawati) ते विन्हेरे (winhere) स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली होती. यामुळे पहाटे 1 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक (Rail transport) विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस (Konkananya Express)मार्गस्थ झाली. दरम्यान सध्या डिझेल इंजिन असलेल्या गाड्याची वाहतूक सूुरू आहे.  (Raliway Updates : Konkan Kanya Express was on its way after almost five hours )

अधिक वाचा  : अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले पुरोगामी राज्याचे अनेक CM

विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होत असली तरी या वाहतूक विस्कळीतपणाचा त्रास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री  उदय सामंतांना झाला. राज्य उद्योग मंत्री सामंत रत्नागिरी दौरा करणार होते, परंतु वाहतूक सुरळीत नसल्याने सामंत यांनी पुन्हा  मुंबई गाठली. भापजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही वाहतूक विस्कळीतपणाचा फटका बसला.चंद्रशेखर बावनकुळे कोकण कन्या एक्स्प्रेसनं प्रवास करत आहेत.कोकण कन्या गाडी जवळपास साडेतीन तास उशिरानं धावत आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून आज ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत.

अधिक वाचा  :  अमित देशमुखांबद्दल अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...

दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबलेल्या होत्या. बिघाड झालेली रेल्वे मार्गस्थ होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी