Sadanand Kadam detained by ED: राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त समोर येत आहे. दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सदानंद कदम हे उद्योजक आहेत आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदानंद कदम यांना खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या निवासस्थानातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
हे पण वाचा : म्हणून लहान मुले माती किंवा खडू खातात
दापोली येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त असून ईडीची टीम सदानंद कदम यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
हे पण वाचा : निरोगी आणि मजबूत हिरड्या हव्या आहेत? मग हे करा
अनिल परब यांचे दापोली-मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले साई रिसॉर्ट हे नियमांचे उल्लंघन करुन बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या संदर्भातील सर्व कागदपत्रेही सोमय्यांनी सादर केली होती. या रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले आहे. तसेच विनापरवानगी आणि कायद्याचे उल्लंघन करुन रिसॉर्टचं बांधकाम झाले आणि या रिसॉर्टच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या पैशांच्या संदर्भातही सोमय्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्रही सुरू केलं होतं. आता या प्रकरणात सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं आहे.
हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?
#Dapoli #SaiResort Scam #SadanandKadam Arrested (Anil Parab's Partner) — Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 10, 2023
ab
Kya Hoga Tera #anilparab @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत किरीट सोमय्या यांनी म्हटलं, "अनिल परबांचे पार्टनर सदानंद कदम यांना अटक झालीय अब क्या होगा तेरा #anilparab"