मातोश्रीवर पोहचले इतके खोके..., शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

ramdas kadam : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार महाराष्ट्र विधानभवनात दिसले तेव्हा उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी ५० खोके, एकदम ओके घोषणा दिल्या गेल्या.

Ramdas Kadam's harsh criticism of Uddhav Thackeray
मातोश्रीवर पोहचले इतके खोके..., शिवसेनेचा नेत्याचा गौप्यस्फोट   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
  • मातोश्रीवर मिठाईचे किती खोके पोहोचले हे मला माहीत आहे.
  • उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या विचारांवर चालत आहेत,

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यास शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हापासून आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बंडखोर आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप होत आहे. (Ramdas Kadam's harsh criticism of Uddhav Thackeray)

अधिक वाचा : Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या सुरक्षा रक्षकाकडून अपमान झाल्याने तरुणीची आत्महत्या, आईने बाप्पाला लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ

त्याला उत्तर देताना आज रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना माजी मंत्री रामदास कदम म्हणाले की, आदित्य ठाकरे ज्या ५० खोक्यामध्ये आमदार शिंदे गटाचे आमदार विकल्याची चर्चा करतात, त्या मातोश्रीवर मिठाईचे किती खोके गेलेत? मला सर्व माहीत आहे...माझे तोंड उघडायला लावू नका, असा इशारा कदम यांनी दिला.  

अधिक वाचा : Raj Thackeray : शिंदे गट, भाजप आणि मनसे महानगरपालिका निवडणुकीत एकत्र? एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहेत, तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या विचारांवर चालत असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा अनादर करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे.

दसरा मेळावा घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना आता अधिकार नाहीत. माझी अजून एकनाथ शिंदे जवळ चर्चा झाली नाही मात्र मुंबईत गेल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आपल्याकडे आहेत त्यामुळे शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे गटाचा असल्याचा सांगून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी