मुंबई : खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana) यांनी केलेल्या गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai police) प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्हीमधील आहे. यामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा पोलिस ठाण्यात चहा पिताना दिसत आहेत. दोघेही पोलिस ठाण्यात अगदी आरामात बसून बोलत आहेत. (Rana couple was seen drinking tea and coffee in the police station, Mumbai Police Commissioner shared CCTV)
अधिक वाचा : धक्कादायक ! हातपाय बांधून विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thackaray) यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसाचे (Hanuman chalisa) पठण करण्याची घोषणा करणाऱ्या अमरावती खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. दरम्यान, जेव्हा नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पोलिसांनी त्यांना पाणी प्यायला दिले नाही किंवा टॉयलेटमध्येही जाऊ दिले नाही, असा आरोप केला आहे.
अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यांनी महाराष्ट्र सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला आणि म्हणाले, पोलीस आपल्याशी अमानुष वागणूक देत आहेत. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व गृह मंत्रालयानेही महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला आहे.
अधिक वाचा :
हनुमान चालीसा वाद प्रकरणी अटकेत असलेले नवनीत आणि रवी राणा यांना सध्या मुंबईतील सत्र न्यायालयातून दिलासा मिळालेला नाही. या दोघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. आता या प्रकरणावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. वास्तविक, हनुमान चालिसाच्या पठणावरून वाद निर्माण झाल्यानंतर शनिवारी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १५ए आणि ३५३ तसेच मुंबई पोलिस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वात मोठे कलम 124A म्हणजेच देशद्रोहाचे कलमही लागू करण्यात आले आहे.