रत्नागिरीत कदम पिता-पुत्र साईडलाईन, अनिल परब यांच्या विरोधात माहिती पुरवण्याचे प्रकरण भोवले

removes ramdas kadams supporters : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पक्षातील रामदास कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याचे समजते. शिवसेना पदाधिकार्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून कदम यांच्या समर्थकांना त्यात स्थान दिलेले नाही. शिवसेनेत नवीन पदाधिकारी नियुक्ती करत रामदास कदम व विद्यमान आमदार योगेश कदम यांना परिवहनमंत्नी अनिल परब यांनी शह दिला

Ratnagiri step kadam father-son sideline,A case of providing information against Anil Parab has been registered
रत्नागिरीत कदम पिता-पुत्र साईडलाईन, अनिल परब यांच्या विरोधात माहिती पुरवण्याचे प्रकरण भोवले,   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर दिली
  • उमेदवार निवडीचे अधिकार आमदार योगेश कदम यांना न देता, ते अन्य नेत्यांना देण्यात आले आहेत.
  • निवडणुकांच्या तोंडावर कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का

removes ramdas kadams supporters रत्नागिरी : शिवसेनेत (shivsena) पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्या व्यक्तीला नेतृत्वाबरोबरच शिवसैनिकांच्या (shivsainik) रोषालाही सामोरं जावं लागतं. याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. त्यातलचं सध्याच ताजं उदाहण म्हणजे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas kadam) हे ठरत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांच्या विरोधात भाजपच्या (bjp) नेत्यांना माहिती पुरवल्याचे समोर आल्यानंतर विधान परिषदेचे (mlc) तिकिट कापले. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य निवडणूकीची जबाबदारी ना. परब यांना दिली आहे. तसेच पदाधिकारी निवडीतही कदम समर्थकांना बाजू ठेवले आहे. (Ratnagiri step kadam father-son sideline,A case of providing information against Anil Parab has been registered)

शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी परिवहन मंत्री अनिल परब बुधवारी आले होते. शिवसेनेने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर दिली. यावेळी त्यांनी दापोली व मंडणगड तालुक्यातील शिवसेनेच्या काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. दापोली खेड मंडणगड विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, दापोली तालुका हंगामी तालुकाप्रमुख ऋषी गुजर,मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवले,उपजिल्हाप्रमुख राजकुमार निरगुडकर,दापोली शहरप्रमुख संदीप चव्हाण, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी यांची आपम हंगामी निवड करत असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली.  यावेळी कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत, खा. सुनील तटकरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम,माजी आमदार सूर्यकांत दळवी आदी उपस्थित होते.

जाहीर सभेत कदमांवर टिका

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना ना. परब म्हणाले, दापोलीत शिवसेनेची शी आघाडी झाली असून आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन आपण आलो आहे. त्यामुळे दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत फक्त शिवसेना व राष्ट्रवादी हेच दोन पक्ष लक्षात ठेवा बाकी कोणीही काही सांगितले तरी विश्वास ठेऊ नका. असे सांगत परब यांनी रामदास कदम,आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली. 

परब-कदम यांच्यात काय आहे वाद                        

रामदास कदम हे शिवसेनेतील एक आक्रमक नेते आहेत. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी पर्यावरण मंत्रिपद भूषवलं आहे. पूर्वी ते विरोधी पक्ष नेतेही राहिले आहेत. सुपुत्र योगेश कदम हे सध्या दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र, महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने नाराजीतून त्यांनी अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. रामदास कदम व आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळं कदम यांच्यावरील संशय बळावला होता. या संपूर्ण घटनाक्रमामुळं मातोश्रीची नाराजी ओढावून घेतली आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी