रत्नागिरी - साखरपा येथे बर्निंग बसचा थरार

कोल्हापूर महामार्गावर बेळगावहून रत्नागिरीकडे येणारी बेळगाव, कर्नाटक डेपोची बस आंबा घाट उतरल्यानंतर साखरपा जाधववाडी येथे उलटून गाडीने पेट घेतला

Ratnagiri - The thrill of a burning bus at Sakharpa
रत्नागिरी - साखरपा येथे बर्निंग बसचा थरार 
थोडं पण कामाचं
  • कोल्हापूर महामार्गावर बेळगावहून रत्नागिरीकडे येणारी बेळगाव, कर्नाटक डेपोची बस
  • आंबा घाट उतरल्यानंतर साखरपा जाधववाडी येथे उलटून गाडीने पेट घेतला
  • सुदैवाने रत्नागिरीकडे येणारे एकूण 13 प्रवासी बस मध्ये होते प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली

सचिन कांबळे, रत्नागिरी :  कोल्हापूर महामार्गावर बेळगावहून रत्नागिरीकडे येणारी बेळगाव, कर्नाटक डेपोची बस आंबा घाट उतरल्यानंतर साखरपा जाधववाडी येथे उलटून गाडीने पेट घेतला दरम्यान, प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. सुदैवाने रत्नागिरीकडे येणारे एकूण 13 प्रवासी बस मध्ये होते प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला आहे. जखमींना तातडीने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दोन रुग्णवाहिकेतून साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.अपघाताची खबर मिळताच तातडीने स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचवून त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले गाडीने पूर्ण पेट घेऊन हवेत धुराचा लोड पसरला आहे. अधिक तपास साखरपा पोलीस करीत आहेत

पाहा व्हिडिओ : 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी