राज्यात कोरोनाचा धोका ओळखून गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलीस करणार आता वर्क फ्रॉम होम

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, मोठ्या संख्येने पोलिस सकारात्मक येत आहेत, 55 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पोलिसांना घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यांना ड्युटीवर येण्याची गरज नाही. जे पोलिस पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय सुविधा मिळत राहतील. पाटील म्हणाले की, शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे.

Recognizing the threat of corona in the state, the Home Department's big decision will now make the police work from home
राज्यात कोरोनाचा धोका ओळखून गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम करणार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
  • कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १२३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
  • महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे.

मुंबई : मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारचे सर्व प्रयत्न आता फोल ठरताना दिसत आहेत. गेल्या 24 तासांत शहरात 71 पोलीस कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 9510 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १२३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबई पोलिसांचे २६५ कर्मचारी कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. (Recognizing the threat of corona in the state, the Home Department's big decision will now make the police work from home)

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आता गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने पोलिस पॉझिटिव्ह येत असल्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पोलिसांना घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यांना ड्युटीवर येण्याची गरज नाही. जे पोलिस पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांना पूर्वीप्रमाणेच वैद्यकीय सुविधा मिळत राहतील. पाटील म्हणाले की, शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे.

कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागतोय. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  या पार्श्वभूमीवर गृह विभागाने 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी