Beed : पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन संघर्ष पेटणार

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला तीन गावांतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यामुळे भगवान गडावरील दसरा मेळावा वादात सापडला आहे.

Resignation of office bearers in support of Pankaja Munde, Dasara gathering at Bhagwan Gada will spark conflict ।
पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे राजीनामा, भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन संघर्ष पेटणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्या वरून संघर्ष
  • जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
  • आता पंकजा मुंडे आणि या समितीत संघर्ष सुरू झाला.

बीड : एकीकडे मुंबईमध्ये दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना आता बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झाला आहे. या दसरा मेळाव्याला भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नगर आणि बीड जिल्ह्यातील तीन गावातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ज्यात बीड जिल्ह्यातील घोगस पारगा आणि अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी या गावांचा समावेश आहे. (Resignation of office bearers in support of Pankaja Munde, Dasara gathering at Bhagwan Gada will spark conflict ।)

अधिक वाचा : Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावर येणार, दिघेंच्या देवीची करणार आरती

या संघर्षाचा परिणाम म्हणजे जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. भगवान गडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी राजकीय भाषण करण्यास विरोध केला होता. आता त्याच भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने पुढाकार घेतला. त्यामुळे अनेक वंजारी समाजातील बांधव नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. 

गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घोषित केल्याप्रमाणे गडावर कोणतेही राजकीय भाषण होणार नसल्याची माहिती मेळावा कृती समितीने दिली आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी ज्यांना यायचे, त्यांनी ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलावे, मेळाव्याला राजकीय स्वरूप राहणार नाही, असेही मेळावा कृती समितीने स्पष्ट केले आहे. 

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन केली. आणि याच माध्यमातून भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि या समितीत संघर्ष सुरू झाला. दसरा मेळावा एकच होईल समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, अशा भावना व्यक्त करून जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी