मुंंबई : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या निवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढू शकते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाने गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवृत्तीचे वय ६० वर्षांपर्यंत वाढवण्याचे समर्थन केले आहे. (retirement age by 2 years will increase from 58 to 60 years in Maharashtra )
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, अधिकारी महासंघाचे संस्थापक तसेच मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष विष्णू पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय 2 वर्षांपर्यंत वाढवले जाऊ शकते. यावर सरकार विचार करत आहे. सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे केले जाऊ शकते. बैठकीत अधिकारी संघटनेने केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे.
अधिक वाचा : MHADA Lottery: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडा येत्या वर्षभरात 12724 घरे बांधणार
तसेच 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील कर्मचारी करत आहेत. आता कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढू शकते. सध्या कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे, ते 60 वर्षे केले जाऊ शकते. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे होते. यासोबतच देशातील बहुतांश राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही त्याची मागणी सुरू झाली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.