'रिंगण'च्या संत सावता माळी विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन, पंढरपुरात पार पडला सोहळा

गावगाडा
Updated Jul 12, 2019 | 20:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

संताची भूमी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला संत परंपराचीं ओळख व्हावी यासाठी रिंगणने यंदा सावता माळी हा आषाढी वार्षिक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले.

ringan publication
रिंगण प्रकाशन सोहळा 

थोडं पण कामाचं

  • रिंगणच्या संत सावता माळी विशेषाकांचे प्रकाशन
  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलमंदिरात झाले प्रकाशन
  • रिंगणचे यंदाचे सातवे वर्ष 

मुंबई: आपल्या महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या या मातीत अनेत संत मंडळी होऊन गेली आहेत. अनेक असे संत आहेत ज्यांची नावेच अनेकांना माहीत नाही आहेत मात्र त्यांनी केलेली कार्ये जिवंत आहेत. आपल्या महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतानी ओवी, अभंगाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे. समाजाला योग्य दिशा दाखवली आहे. समाजातील जाती व्यवस्थेवर संतांनी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून परखडपणे टीकाही केली आहे.  
याच संताची ओळख लोकांना करून देण्याचे काम गेली काही वर्षे रिंगण करत आहे. रिंगणच्या माध्यमातून आजच्या पिढीला विविध संताची ओळख होत असते. रिंगणमध्ये दरवर्षी एका नव्या संतांबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली असते. 

संत परंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणारा वार्षिक आषाढी विशेषांक 'रिंगण'चे प्रकाशन आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात  रिंगणच्या 'संत सावता माळी' विशेषांकाचं प्रकाशन झालं. रिंगणचे हे सातवे वर्ष आहे.

संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार हे अंक आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या अंकांना वाचक, वारकरी आणि अभ्यासकांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे संत सावता माळी विशेषांकाची उत्सुकता सर्वांना लागली होती. 

कार्यक्रमस्थळी उपस्थित पत्रकारांना उत्तर देताना रिंगणचे संपादक सचिन परब यांनी सांगितलं की, संत सावता माळी यांनी दिलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत. हे विचार तरूण आहेत, बंडखोर आहेत. आणि आजच्या काळालादेखील नवं वळण देणारे आहेत. हे विचार, त्यांचं व्यक्तित्व, त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या अरण, लऊळ, पंढरपूर, माळीनगर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पत्रकारांनी मांडले आहेत. 'स्व-कर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात' असं सांगत संत सावता महाराजांनी  देव, धर्म आणि भक्ती सोपी केली आहे. ते आजही मार्गदर्शक आहे.

आर्ट पेपरवर प्रिंट झालेला १५२ पानांचा हा अत्यंत आकर्षक अंक आहे. अवघी १०० रूपये किंमत असलेला हा अंक महाराष्ट्रातल्या मुख्य पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहे. या अंकात डॉ. सदानंद मोरे, हरी नरके, डॉ. रणधीर शिंदे, श्यामसुंदर मीरजकर,  या संतसाहित्यिकांच्या आणि अभ्यासकांसोबतच अनेक पत्रकारांनी रिपोर्ताज लिहिले आहेत. संत सावता माळी यांचं तत्त्वज्ञान, यांचं व्यक्तिमत्व याचबरोबर यांच्या प्रभावाच्या आजपर्यंतच्या खुणादेखील यात मांडण्यात आलेल्या आहेत
रिंगणच्या यंदाच्या अंकालाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'रिंगण'च्या संत सावता माळी विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन, पंढरपुरात पार पडला सोहळा Description: संताची भूमी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला संत परंपराचीं ओळख व्हावी यासाठी रिंगणने यंदा सावता माळी हा आषाढी वार्षिक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले.
Loading...
Loading...
Loading...