कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात मिनी लाॅकडाऊन, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

New Restrictions Maharashtra : नवीन वर्षाची सुरुवात होताच देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. दिल्ली, हरियाणा आणि आता पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन नियम लागू करण्यात आले आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. अशा पध्दतीने महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढल्यास आणखी कडक निर्बंध लागवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Rising number of corona patients in the state is worrisome! Ajit Pawar gave hints of mini lockdown
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात मिनी लाॅकडाऊन, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.
  • अनेक राज्यांमध्ये मिनी लाॅकडाऊन
  • महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याचा राज्य सरकारचा विचार

सातारा : देशात कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत, सर्वच राज्यात कोरोनाची (corona) धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. सर्व राज्यांमध्ये रात्रीच्या कर्फ्यूसह (night curfew) अनेक कठोर निर्बंध (Strict restrictions) असूनही, गेल्या एका आठवड्यात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. फक्त गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे ३३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तिसऱ्या लाटेने दार ठोठावण्याची (The third wave) दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मिनी लाॅकडाऊनचे संकेत दिले आहेत. (Rising number of corona patients in the state is worrisome! Ajit Pawar gave hints of mini lockdown)

सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे,  शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.

गेल्या एका आठवड्यात देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. दिवसेंदिवस केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी आणि रविवारी देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा धोकादायक वेग दिसून आला. तसेच, ओमिक्रॉन या नवीन प्रकाराच्या प्रकरणांनाही गती मिळू लागली आहे. संपूर्ण देशाबद्दल बोलायचे झाले तर, येथे ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1525 च्या पुढे गेली आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आहेत.

27 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान सुमारे 1.3 लाख नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गेल्या 12 आठवड्यांतील हा उच्चांक आहे. एवढेच नाही तर देशातील साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासूनची ही सर्वात मोठी साप्ताहिक उडी होती. 5 ते 11 एप्रिल 2021 या कालावधीत दुसऱ्या लाटेत मागील सर्वोच्च वाढ 71% नोंदवली गेली होती. गेल्या आठवड्यात देशात 46,073 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मे 2020 च्या मध्यापासून ही सर्वात कमी प्रकरणे होती.

अजित पवार म्हणाले, दिल्लीत यलो अलर्ट आधीच जाहीर करण्यात आला आहे, याशिवाय महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या राज्यांमध्ये एक प्रकारचा मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारने ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रात्री कर्फ्यूसह इतर अनेक निर्बंधांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर चिंता व्यक्त केली जात आहे. या वेगाने केसेस वाढत राहिल्यास मुंबई आणि महाराष्ट्रात लवकरच निर्बंध आणखी वाढवावे लागतील, असेही पवार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी