Romanian thieves : रोमानिआच्या हॅकर्सचा दिल्लीपासून गल्लीच्या एटीएममध्ये डल्ला, क्लोन एटीएम कार्डने केली अनेकांची बॅंक खाती रिकामी

रोमानिआतून भारतात आलेल्या दोघांनी बनावट एटीएम कार्डचा वापर करुन अनेकांचे पैसे हडपले. दिल्ली, मुंबईसह अनेक मेट्रो सिटीमध्ये त्यांनी असे गुन्हे केले. आणि अखेर कºहाडमध्ये ते गजाआड झाले.

Romanian hackers stalk street ATMs from Delhi, clone ATM cards empty bank accounts of many
रोमानिआच्या हॅकर्सचा दिल्लीपासून गल्लीच्या एटीएममध्ये डल्ला, क्लोन एटीएम कार्डने केली अनेकांची बॅंक खाती रिकामी ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रोमानिआच्या चोरट्यांना कराड पोलिसांनी अटक केली
  • ‘एटीएम’मधून पैशांपुर्वी चोरायचे ‘डाटा’
  • विविध शहरांमधील लोकांचे लाखो रुपये हडपले

Romanian thieves सातारा : सध्या डिजिटल पेमेंटचा (Digital payment) वापर वाढल्याने आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे. आॅनलाईन पेमेंटमुळे व्यवहार पारदर्शक झाले असले तरी चोरटे या व्यवहारावर बारीक नजर ठेवून असतात. एटीएमच्या (ATM) माध्यमातून होणाऱ्या डिजिटल व्यवहारात चोरटे डाटा चोरतात. त्याच्या माध्यमातून अनेकांची बॅंक खात्यातील पैसे काढून घेतात. कराड शहर पोलिसांनी (Karad City Police) एका एटीएम केंद्रात वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना या दोघांना ताब्यात घेतले. (Romanian hackers stalk street ATMs from Delhi, clone ATM cards empty bank accounts of many)

बनावट एटीएम कार्डचा वापर करुन डल्ला

रोमानिआ देशातून टुरीस्ट व्हिसा’वर (Tourist visa ')भारतात आलेल्या या दोन परदेशी नागरिकांनी बनावट एटीएम कार्डचा वापर करुन दिल्ली, मुंबई, कोल्हापूरपासून अनेकांच्या खात्यातील पैस गायब केले.  अनेक मेट्रो सिटीमध्ये त्यांनी असे गुन्हे केले. आणि अखेर कराडमध्ये ते गजाआड झाले. मलकापुरातील एका एटीएम केंद्रातया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इस्फॅन लुस्टीन जुओर्गल (वय २९) व लुनेट व्हसइल गॅबरिअल (वय २८, दोघे रा. रूमानीया) अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या ७५ बनावट कार्डपैकी ७१ कार्ड अद्यापही अ‍ॅक्टिव्ह असून त्यावर ३५ लाख रुपये आहेत.

क्लोन एटीएम कार्ड’ तयार

त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता पोलीस आश्चर्यचकीत झाले. ते दोघे सुमारे दोन वर्षांपुर्वी रोमानिआतून भारतात आले होते. पर्यटक म्हणून देशातील वेगवेगळ्या शहरात ठराविक कालावधीसाठी त्यांनी वास्तव्य केले. तेथे त्यांनी चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत ‘स्क्रिमर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेकडो बँक ग्राहकांच्या खात्याची माहिती चोरली आहे. चोरलेल्या ‘डाटा’च्या माध्यमातून त्यांनी ‘क्लोन एटीएम कार्ड’ तयार केली आहेत. त्याचा वापर करुन ते पैसे काढत आहेत.

कोल्हापूरातून कराडात आले आणि फसले

तपास अधिकारी अमित बाबर यांनी सांगितले की, हे आरोपी दिल्लीमध्ये एका गुन्ह्यात अडकले. त्याठिकाणी त्यांना अटक झाली. त्या गुन्ह्यातून त्यांना जामिन मिळाल्यानंतर ते तेथुन बाहेर पडले. २५ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात वास्तव्यास होते. तेथील एका सहकारी बँकेच्या एटीएम केंद्रातून वारंवार त्यांनी पैसे काढले. त्यावेळी तक्रारी वाढल्यामुळे संबंधित बँकेने त्यांच्या एटीएम केंद्रात केवळ त्यांच्याच बँकेचे एटीएम चालेल, अशी सिस्टिम केली. आणि कोल्हापुरात पैसे काढण्यास अडचणी येऊ लागल्यामुळे आरोपी कºहाडमध्ये सहकारी बँकांची एटीएम शोधत आले होते.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी