Sai Resort case, Anil Parab property seized, ED seized Anil Parab property : महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने अनिल परब यांची 10 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीने अनिल परब यांच्या विरोधात कारवाई केली. याआधी अनिल परब यांची सखोल चौकशी झाली होती. यानंतर कायदेशीर प्रक्रिया करुन अनिल परब यांची संपत्ती जप्त करण्यात आली.
ईडीने 42 गुंठे जमीन आणि साई रिसॉर्ट हे दोन्ही जप्त केले. जप्त केलेल्या जमिनीची किंमत 2 कोटी 73 लाख 91 हजार रुपये आहे. ईडीने जप्त केलेल्या साई रिसॉर्टची किंमत 7 कोटी 46 लाख 47 हजार रुपये आहे.
जप्तीची कारवाई करण्याआधी ईडीने अनिल परब, रत्नागिरी जिल्ह्यातील एक केबल व्यावसायिक, एक तलाठी आणि एक ग्रामसेवक यांची कसून चौकशी केली. चौकशी करुन सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले. साई रिसॉर्टशी संबंधित कागपत्रांची छाननी करण्यात आली. अनिल परब यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यात आले.
Paush Purnima : कधी आहे नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा? जाणून घ्या पौर्णिमेचे व्रत आणि उपाय
January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस
भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर ईडीने तपास केला. चौकशी तसेच कागपत्रांच्या छाननीची प्रक्रिया केली. यानंतर कायदेशीर प्रक्रिया करुन ईडीने अनिल परब यांची संपत्ती जप्त केली.