मुंबई : कार्डिलिया क्रूझ (Cardilia Cruise) ड्रग्ज प्रकरणातील (Drugs Case) साक्षीदार (Witness) प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गाजलेल्या एक प्रकरणात साक्षीदार असलेल्या साईलचा मृ्त्यू झाल्याने संशय येणं स्वाभाविक आहे. याच संशयातन पोलीस महासंचालकांमार्फत (Director General of Police) साईलच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. साईल हा शरीराने धडधाकट आणि केवळ ३७ वयाचा होता. म्हणून साईलच्या या अकाली मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. साईलला स्लो पॉयझनिंगमुळे हृदयविकाराचा झटका आला किंवा इतर कोणत्या मार्गाने मारण्यात आले का याची तपासणी करण्यात येणार आहे.
साईल चेंबूर उपनगरातील माहूळ भागात पत्नी, दोन मुलांसोबत राहत होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु शुक्रवारी दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. पंच साईल याच्या मृत्यूनंतर संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. मृत्यू मागचे नेमके सत्य काय आहे हे समोर येण्यासाठी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत चौकशी अहवाल येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
ड्रग्ज खटल्यात अडकल्याने प्रभाकरला नोकरी मिळाली नाही, बेरोजगारी व कुटुंबाच्या पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे तो तणावात असल्याचे त्याचे वकील तुषार खंदारे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी हा मृत्यू नैसर्गिक असून आपल्याला काहीही शंका नसल्याची प्रतिक्रिया दिली.
क्रूझ ड्रग्ज कारवाईत सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. या कारवाईतील साक्षीदार पंच किरण गोसावी याचा प्रभाकर साईल हा बॉडीगार्ड होता. या कारवाईवेळी मुंबई एनसीबीला २५ कोटी व त्यापैकी ८ कोटी रुपये तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांना देण्यासाठी मांडवली करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप साईल याने केला होता.
Read Also : गौतम अदानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय, 100 अब्ज डॉलर...
क्रूझ ड्रग केसमध्ये आर्यन खानला अटक करताना प्रसिद्धीच्या झोतात आलेला के. पी. गोसावी याचा सुरक्षा रक्षक व चालक म्हणून प्रभाकर काम करीत होता. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईवेळी पंचनाम्यावर किरण गोसावीसोबतच प्रभाकरची पंच म्हणून स्वाक्षरी आहे. काही दिवसांनी गोसावी यात वानखडेंच्या वतीने खान कुटुंबासोबत मांडवली करीत असल्याचे प्रतिज्ञापत्रक करून प्रभाकरने एनसीबीच्या विरोधात प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. एनसीबीच्या अनेक अटकसत्रांत अशाच प्रकारे पंच म्हणून आपल्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे त्याचे म्हणणे होते. प्रभाकरच्या या जबानीमुळे आर्यन खान खटल्यास मोठी कलाटणी मिळाली होती.
Read Also : मशिदीवरील लागलेले भोंगे उतरवावेच लागतील - राज ठाकरे
केवळ आर्यन खान प्रकरणच नव्हे तर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांबाबतही साईलची महत्त्वाची भूमिका असल्याने कुटुंबीयांची मागणी नसतानाही महत्त्वाच्या खटल्यातील पंच व साक्षीदार या भूमिकेतून पोलीस महासंचालकांच्या आदेशाने त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याचा व्हिसेरा पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे.