सलमानला शेजाऱ्यासोबतचा वाद भोवणार

Salman Khan claim of being defamed does not hold as neighbour has proof says Mumbai court : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला शेजाऱ्यासोबतचा वाद भोवण्याची चिन्ह आहेत.

Salman Khan claim of being defamed does not hold as neighbour has proof says Mumbai court
सलमानला शेजाऱ्यासोबतचा वाद भोवणार 
थोडं पण कामाचं
  • सलमानला शेजाऱ्यासोबतचा वाद भोवणार
  • सलमानने शेजाऱ्याविरोधात बदनामी केल्याची याचिका दाखल केली होती
  • कोर्टाने सलमानची शेजाऱ्याच्या विरोधातील याचिका फेटाळली

Salman Khan claim of being defamed does not hold as neighbour has proof says Mumbai court : पनवेल : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला शेजाऱ्यासोबतचा वाद भोवण्याची चिन्ह आहेत. सलमानने शेजाऱ्याविरोधात बदनामी केल्याची याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने सादर झालेल्या पुराव्यांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे सांगत सलमानची शेजाऱ्याच्या विरोधातील याचिका फेटाळली आहे. कोर्टाचा हा निर्णय म्हणजे सलमान खानला धक्का असल्याची चर्चा आहे.

अभिनेता सलमान खान याचे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊस जवळ केतन कक्कड नावाच्या परदेशी राहणाऱ्या भारतीय नागरिकाने एक भूखंड खरेदी केला. खरेदी केलेल्या भूखंडावर स्वतःचे फार्म हाऊस विकसित करायचे आणि निवृत्ती नंतर तिथे राहण्यासाठी यायचे अशी केतन कक्कड यांची योजना होती. पण मागील सात-आठ वर्षांपासून ही जमीन सलमान खानने बेकायदेशीररित्या बळकावली असल्याचा आरोप केतन कक्कड यांनी केला आहे. 

सलमानच्या पनवेलमधील फार्म हाऊस संदर्भात केतन कक्कड यांनी यू ट्युबवरून गंभीर आरोप केले आहेत. सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी केतन कक्कड यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. केतन कक्कड आपली बदनामी करत असल्याचा आरोप करत सलमानने कोर्टात दाद मागितली होती. पण कोर्टाने कक्कड यांच्या बाजुने कौल दिल्यामुळे सलमानची पंचाईत झाल्याचे वृत्त आहे.

  1. केतन कक्कड यांचा आरोप - मला माझ्या जमिनीवर जाण्यापासून अडवले जात आहे. ही अडवणूक सलमान खान करत आहे तसेच सलमानसाठी काम करणारी माणसं अभिनेता सलमान खान याच्या आदेशावरून माझी अडवणूक करत आहेत. 
  2. सलमान खान याचा आरोप - केतन कक्कड यांच्या आरोपात तथ्य नाही. कक्कड माझी बदनामी करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा आणि डिजिटल माध्यमांचा वापर करत आहेत. 
  3. कोर्टाचा निर्णय - सलमान खान त्याचे आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करू शकला नाही. पण केतन कक्कड यांनी स्वतःचे म्हणणे मांडताना सादर केलेल्या पुराव्यांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य दिसते. यामुळे केतन कक्कड बदनामी करत असल्याच्या सलमानच्या आरोपाला कोर्ट फेटाळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी