Sameer Wankhede: क्लीन चिट मिळताच समीर वानखेडेंचा पलटवार, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 15, 2022 | 07:46 IST

Case Against Nawab Malik:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sameer Wankhede files case against Nawab Malik
नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या 
थोडं पण कामाचं
  • मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं क्लीन चिट दिली आहे.
  • समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं क्लीन चिट दिली आहे.
  • समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मुंबई:  Sameer Wankhede files case against Nawab Malik: मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede)  यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे त्यांना नुकताच दिलासा मिळाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon police station)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाब मलिक सध्या तुरूंगात आहेत. 

समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे मलिकांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा-  मोठी बातमी! भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढांविरोधात प्रारूप आरोपपत्र दाखल
 
गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या 1860 कलम  500, 501, ​​अनुसूचित जाती/जमाती कायद्याच्या 3(1) अन्वये नवाब मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव विभागाचे एसपी या प्रकरणासंदर्भात अधिक चौकशी करणार असल्याचं समजतंय.

मलिक यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर वानखेडे यांनी तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडे यांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत ही तक्रार दाखल केली. मंत्री असताना मलिक यांनी वानखेडे यांच्यावर एससी-एसटीची बनावट कागदपत्रे बनवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता.

वानखेडे यांना क्लीन चिट दिली

मुंबई पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला. यापूर्वी समीर वानखेडे यांच्या बाजूने निकाल देताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं 91 पानी आदेशात वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा युक्तिवाद फेटाळून लावला होता. जन्माने ते मुस्लीम नसून महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिला. 

वानखेडे आणि त्यांचे वडील महार समाजातील

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील महार समाजाचे असल्याचंही वानखेडे यांनी सांगितले होतं. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने शुक्रवारी क्लीन चिट आदेश जारी केला, असे एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. वानखेडे हे जन्माने मुस्लिम नव्हते, असे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर वानखेडे आणि त्याच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला हेही सिद्ध झालेलं नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी