Govinda Death: विलेपार्ल्यातील जखमी गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी, 24 वर्षांच्या संदेशचा मृत्यू

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 23, 2022 | 07:56 IST

Sandesh Dalvi first Govinda death:दहीहंडीवेळी (Dahi handi) सातव्या थरावरून कोसळून हा गोविंदा जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

Govinda Sandesh Dalvi death
मुंबईत जखमी गोविंदाचा मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • 24 वर्षांचा गोविंदा तरूण गेल्या दोन दिवसांपासून रूग्णालयात दाखल होता.
  • संदेश दळवी हा शिवशंभो गोविंदा (Shivshambho Govinda) पथकातील होता.
  • विलेपार्लेमध्ये सातव्या थरावरून कोसळून तो जखमी झाला होता.

मुंबई:  A 24-year-old Sandesh Dalvi, First Govinda death in Mumbai: मुंबईत एका जखमी गोविंदाचा (Injured Govinda) मृत्यू (Died) झाल्याची बातमी समोर येत आहे. दहीहंडीवेळी (Dahi handi)  सातव्या थरावरून कोसळून हा गोविंदा जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 

संदेश दळवी (Sandesh Dalvi)  हा 24 वर्षांचा गोविंदा तरूण गेल्या दोन दिवसांपासून रूग्णालयात दाखल होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. संदेश दळवी हा शिवशंभो गोविंदा (Shivshambho Govinda)  पथकातील होता.

अधिक वाचा-  शेतकऱ्यानी हेल्मेटनं फोडले भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याचं कार्यालय, पहा व्हिडीओ

विलेपार्लेमध्ये सातव्या थरावरून कोसळून तो जखमी झाला होता. त्याच्या मेंदूला दुखापत झाली होती. पडल्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी ही त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न अपयशी ठरलं. संदेशचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

24 वर्षांच्या संदेश दळवीच्या घरी आई वडील आणि तीन भावंडं असं कुटुंब आहे. तो मूळचा विलेपार्लेचा असलेला संदेश सध्या कुर्ल्यामध्ये राहत होता. 

संदेश थरावरून पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओनुसार, दहीहंडीत तो सर्वात वरच्या म्हणजेच सातव्या थरावर होता. हंडी फोडल्यानंतर त्याचा एकाबाजूला तोल गेला आणि तो खाली जमिनीवर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला. पडल्यानंतर त्याला तात्काळ नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र सोमवारी त्याचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी