सांगली : येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची तक्रार सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झाली. याप्रकरणी पोलीस तपास करीत असताना आज कवठेपिरान गावच्या हद्दीत नदी पात्रात मृतदेह तरंगताना आढळला. हा मृतदेह बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील ((वय ५४) )यांचा असल्याची निष्पन्न झाले आहे. (Sangli crime: Body of kidnapped contractor found in Warna river after three days)
अधिक वाचा : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते आले, मान खाली घातली अन् शांतपणे निघून गेले...
याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले की, सांगलीतील राम मंदिर परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांचे त्याच्या गाडीसह अपहरण झाल्याची तक्रार विक्रमसिंह माणिकराव पाटील (वय २८) यांनी दि. १३ रोजी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अधिक वाचा : Aaditya Thackeray: 'मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात', आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
माणिकराव पाटील हे १३ रोजी ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ ते पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास प्लाॅट दाखवण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. परंतू रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत. तसेच त्यांचा मोबाईलही बंद लागत असल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने शोधाशोध केली असता काल रात्री त्यांची गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात सापडली होती.
आज सकाळच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावच्या हद्दीत नदी पात्रात एक मृतदेह तरंगताना आढळला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने धाव घेत पाहणी केली असता हा मृतदेह पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान,नदी पात्रात हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून घातपताची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.