नादखुळा ! सांगलीच्या मॅकेनिकने बनवली अवघ्या 30 हजारात कार, मिनी जिप्सी पाठोपाठ FORD 1930 मॉडेलची गाडी व्हायरल

FORD 1930 model car viral : मागील पंधरा दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावच्या दत्ता लोहार यांनी बनवली मिनी जिप्सी चांगली चर्चेत आली होती. त्यानंतर आता सांगलीच्या एका मॅकेनिकने 30 हजारात बनवलेली सेम टू सेम FORD 1930 मॉडेलची गाडी व्हायरल होते.

Sangli mechanic designs only 30,000 cars, Mini Gypsy followed by FORD 1930 model car viral
नादखुळा ! सांगलीच्या मॅकेनिकने बनवली अवघ्या 30 हजारात कार, मिनी जिप्सी पाठोपाठ FORD 1930 मॉडेलची गाडी चर्चा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सांगलीतील मिनी जिप्सीनंतर आणखी एक मॅकेनिक चर्चेत
  • 30 हजारात बनवलेली सेम टू सेम FORD 1930 मॉडेलची गाडी
  • you tube वर चे व्हिडिओ पाहून तयार केली ब्रिटीश कालीन व्हिंटेज कार

सांगली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर भयंकर वाढले आहे. त्यात बाजारात आलेल्या नवनवीन कार आणि त्यांच्या किमंती एेकल्या की, सामान्य माणूस गाडी चालवण्यापूर्वी चार वेळा विचार करतो. अशा परिस्थितीत अवघ्या तिसर हजारांमध्ये फोर्ट कंपनीची कार आली तर विश्वास बसणे थोडे कठीण जाईल. मात्र सांगली जिल्ह्यातील एका मेकॅनिकने हा पराक्रम केला आहे. काकानगर येथील रहिवासी असलेल्या 44 वर्षीय अशोक आवटी यांनी एक अशी कार बनवली आहे. भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही 1930 सालची ही फोर्ट गाडीची हुबेहूब सेकंड काॅपी गाडी बनवलीय.  या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Sangli mechanic designs only 30,000 cars, Mini Gypsy followed by FORD 1930 model car viral)

youtube वर पाहून सुचली कल्पना

काही दिवसांपूर्वी देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी चांगलीच चर्चेत आली होती. आता सांगली शहरातीलच सांगली-कर्नाळ रोडवरील गॅरेजच्या मॅकेनिकलची एक ब्रिटिशकालीन फोर्ट गाडी व्हायरल होत आहे.लॉकडाऊन काळात you tube वर चे व्हिडिओ पाहून घरात एक चार चाकी गाडी मुलाना खेळण्यासाठी बनवावी, असा विचार मनात आला. आणि अडीच वर्षात स्वप्न सत्यात उतरवले.

पेट्रोल प्रति लिटर ३० कमी मायलेज

आपल्या देशात व्हिंटेज कार खरेदी करणे हे अनेकांसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. अशा कार केवळ पाहण्यातच मनोरंजक नसतात, तर खरेदी आणि ऑपरेट करण्यासाठी देखील महाग असतात. अशा स्थितीत अशी कार घेण्याचे बहुतांश लोकांचे स्वप्न स्वप्नच राहते. पण सांगली अशोट आवटी या हा असा व्यक्ती आहे जो केवळ आपल्या कौशल्याने आपल्या स्वप्नांची गाडी चालवत नाही तर त्याने ब्रिटिश कालीन फोर्ट कारची ब्लू प्रिंटही तयार केली आहे. रिक्षा प्रमाणे हँड किक वर सुरु होणारी ही गाडी पेट्रोल वर चालते. आणि 30 किमी इतके मायलेज देते . 

कमी खर्चात कार तयार

सांगलीतील काकानगर मध्ये टू व्हीलर गाड्या व ट्रॅक्टर दुरुस्तीचं गॅरेज असलेल्या अशोक यांनी 2019 मध्ये भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही फोर्ट गाडीची हुबेहूब गाडी बनवली आहे. अवघे सातवी पर्यंत शिक्षण झालेल्या अशोक यांना गाड्या दुरूस्त करता-करता गाड्या माॅडिफाय करण्याचा नाद लागला. मुलांसाठी खेळण्यासाठी कार तयार करण्यासाठी  फक्त तीस हजार खर्च आला आहे. गाडीला led लाइट आहेत, इंडिकेटर , हॉर्न अशी ही सेम टू सेम फोर्ड गाडी आहे असे वाटत. वजन जवळपास 100 किलो इतके आहे आणि 3 ते 4 जण सहजरित्या या गाडीने जाऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी