सांगली सामूहिक आत्महत्येचे दिल्ली कनेक्शन? समोर आली धक्कादायक माहिती

गावगाडा
Pooja Vichare
Updated Jun 22, 2022 | 14:38 IST

या आत्महत्या प्रकरणी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार या आत्महत्या प्रकरणाचं मूळ दिल्लीत असल्याचं समजतंय.

Fraud
rice-puller scam  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • म्हैसाळमध्ये (Mahisal) 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्यानं एकच खळबळ माजली.
  • कर्जबाजारीपणा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून कुटुंबानं आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
  • गेल्या काही वर्षांत या प्रकरणाची डझनभर प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

नवी दिल्ली: सांगलीतील (Sangli) मिरज तालुक्यातल्या म्हैसाळमध्ये (Mahisal) 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्यानं एकच खळबळ माजली. या प्रकरणी मिरज ग्रामीण (Miraj taluka) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कर्जबाजारीपणा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून कुटुंबानं आत्महत्या (Family Committed Suicide)केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तसंच या आत्महत्या प्रकरणी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं  आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार या आत्महत्या प्रकरणाचं मूळ दिल्लीत असल्याचं समजतंय. 

सांगली, महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातल्या 9 जणांच्या आत्महत्यामागेचं संभाव्य कारण समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना Rice-puller (तांदूळ खेचणारं यंत्र) घोटाळा या आत्महत्येचं कारण आहे. सध्या दिल्लीत सर्रासपणे Rice-puller घोटाळा सुरु आहे. गेल्या काही वर्षांत या प्रकरणाची डझनभर प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 

या घोटळ्यातून अनेक जणांची फसवणूक झाली आहे. हे यंत्र विकणाऱ्या टोळ्यांकडून काही लाखांपासून ते काही कोटींपर्यंतचा पैसा लोकांकडून उकळला आहे. या टोळीनं आपल्या फसवणुकीचं जाळं केवळ छोटे व्यापारी किंवा शेतकरीच नाही तर मोठे व्यापारीही या घोटाळ्याला बळी पडले आहेत. 

गेल्या मार्चमध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याबाबत कारवाईत केली होती. या कारवाईदरम्यान महाराष्ट्रातील एक आरोपी आणि त्याचा गाझियाबाद येथील एक सहाय्यक व्यावसायिक गौतम पुरी याला 8.93 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल अटक केली. ही अटक धान्य आकर्षित करणारं रेडिओएक्टिव्ह बार विकण्याच्या बहाण्यानं अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हे उपकरण प्रति इंच 11 कोटी रुपयाला मिळत असल्याचं आरोपींनी पीडितेला सांगितलं. मात्र पीडितांकडून पैसे घेऊन ही टोळी पसार झाली. 

फेब्रुवारी 2021 ला एका 53 वर्षीय व्यावसायिकाची 11 लाख रुपयांची फसवणूक केली होती. या व्यावसायिकाला या टोळीनं हजारो कोटी रुपयांचं दुर्मिळ धातू असल्याचा दावा करुन 11 लाख उकळले होते. 2018 मध्ये अनेक व्यावसायिकांना गंडा घालून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं पिता-पुत्राला अटक केली होती. इतकंच नाही तर पीडितांसमोर उपकरण दाखवत असताना आणि चाचणी करताना या टोळींनी रेडिएशनविरोधी कपडेबी घातले होते. 

ही टोळी मुख्यतः व्यापारी आणि शेतकरी यांना प्राधान्यानं लक्ष्य करत असल्याचं तपासकर्त्यांनी सांगितलं. यावर बोलताना डीसीपी (गुन्हे) केपीएस मल्होत्रा म्हणाले की, या टोळीनं इरिडियम, रेडियम इत्यादीपासून बनवलेल्या किरणोत्सर्गी गुणधर्मांसह उपकरणे विकण्याचा दावा केला आहे. एवढंच काय तर 10 लाख ते 10 कोटी रुपयांपर्यंतची प्रारंभिक गुंतवणूक लक्ष्यातून मागितली आहे. 

हे उपकरण अखेरीस यूएस स्पेस एजन्सी नासा किंवा इतर जागतिक अवकाश संस्था शेकडो किंवा हजारो कोटींना विकत घेणार असल्याचं या टोळीतल्या आरोपींनी पीडितांना सांगितलं.

ही टोळी फसवणूक करताना पीडितांना आमिष दाखवण्यासाठी विविध भारतीय आणि परदेशी वैज्ञानिक संस्थांशी संलग्नता दर्शवणारी फेक कागदपत्रे आणि ओळखपत्रे तयार केली होती, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. या प्रकरणी दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये आरोपींनी BARC, ISRO, DRDO, NASA आणि अमेरिकन रेडियम सोसायटी सारख्या एजन्सींचे प्रमाणपत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. 2011 ते 2017 दरम्यान, अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या फसवणुकीची प्रकरणं संपूर्ण भारतातून नोंदवली गेली आहेत. दरम्यान या प्रकरणातले आरोपी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, फरिदाबाद आणि दिल्ली येथील आहेत.

RBI नं केलं सावध 

2018 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं लोकांनी या प्रकरणी सावध केलं. RBI नं म्हटलं की, या उपकरणात जादुई गुणधर्म असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी Rice-puller घोटाळ्याला बळी पडू नये. तसंच यात  तांबे/इरिडियमपासून बनवलेल्या यंत्राचे मार्केटिंग करण्यात आले. ज्यात तांदळाचे दाणे आकर्षित करण्याची क्षमता असते. 

तसंच मध्यवर्ती बँकेनं म्हटलं होतं की, लोकांनी अशा घटनांची माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी. अशा टोळींशी संबंध ठेवल्यास थेट आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसंच लोकांनी अशा ऑफरलाही प्रतिसाद देऊ नये. 

दिल्ली पोलिसांचं लोकांना आवाहन 

या घोटाळ्याची पार्श्वभूमी पाहता दिल्ली पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, लोकांनी अशा कोणतीही ऑफर आल्यास त्वरित तक्रार करावी जेणेकरून या टोळीवर वेळीच कारवाई करता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी