sanjay raut sharad pawar viral photo : आदरातिथ्य करणाऱ्या संजय राऊतांना आव्हाडांचे नमन, व्हायरल फोटोवरुन टीका करणाऱ्यांवर संतापले

संसद परिसरात शरद पवारांना खुर्ची नेऊन देणाऱ्या संजय राऊतांना जितेंद्र आव्हाडांकडून नमन करण्यात आले. तसेच राऊतांवर टिका करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

sanjay raut sharad pawar viral photo : jitendra awhad Greetings to Sanjay Raut, the host, Angry at critics over viral photo
sanjay raut sharad pawar viral photo : आदरातिथ्य करणाऱ्या संजय राऊतांना आव्हाडांचे नमन, व्हायरल फोटोवरुन टीका करणाऱ्यांवर संतापले   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शरद पवारांसाठी संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • या फोटोवरुन भाजपा नेत्यांकडून टिका
  • जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर करत टीकाकारांना सवाल.

sanjay raut sharad pawar viral photo मुंबई : सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यसभेतील १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी विरोधी पक्षातील खासदारांचे संसदेबाहेर आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा ठेण्यासाठी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. दरम्यान, शरद पवारांसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन विरोधक त्यांच्या टिका करीत आहेत. त्याला राऊतांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. आज महाविकास आघाडीचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी संजय राऊत यांच्या आदरातिथ्याला नमन करुन टीका करणाऱ्यांवर संतापले. (sanjay raut sharad pawar viral photo : jitendra awhad Greetings to Sanjay Raut, the host, Angry at critics over viral photo)

निलंबित खासदारांची निदर्शने

संसद परिसरात निलंबित खासदारांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी पवारांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत खुर्ची घेऊन जात असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली. ते म्हणाले, धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच.

भाजपच्या टिकेला राऊतांचे उत्तर

यावर संजय राऊतांनी त्यांना उत्तर दिलं आहे. “कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

जितेंद्र आव्हाडांचा सवाल

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. आदरातिथ्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? अशी विचारणा त्यांनी टीकाकारांना केली आहे.

“संजय राऊत यांनी काल शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही. वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे?,” अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी